Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिलं – माझं बलिदान…

नांदेड : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) नांदेडमधील हदगाव तालुक्यात तरुणाने आत्महत्या (Suicide Case) केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या २४ वर्षीय तरुणाचे नाव शुभम सदाशिव पवार Shubham Sadashiv Pawar (रा.वडगाव. ता हदगाव) असून त्याने विष पिऊन आत्महत्या केली. शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास अर्धापूर हद्दीत तामसा रोडवरील एका मंगल कार्यालय परिसरातील झाडीत त्याचा मृतदेह आढळला. (Maratha Reservation)

शुभम पवार याने आत्महत्येपूर्वी एक भावनिक चिठ्ठी लिहिली असून त्यात म्हटले आहे की, एक मराठा लाख मराठा मराठा. आरक्षण भेटण्यासाठी मी माझ्या जिवाचे बलिदान देत आहे. माझे हे बलिदान वाया जाऊ नये. मी शुभम सदाशिव पवार.

शुभम पवार मुंबईत शिक्षण आणि प्लम्बरचं काम करत होता. शनिवारी तो गावी आला. त्याने वडिलांना फोन करून सांगितले की, आधी बहिणीकडे जातो, नंतर गावात येतो. संध्याकाळपर्यंत शुभम घरी न आल्याने कुटुंबियांनी मुलीला फोन करुन विचारले असता तो आलाच नसल्याचे समजले. (Maratha Reservation)

इतरत्र चौकशी केली पण त्याचा शोध लागला नाही. अखेर कुटुंबियांनी तामसा पोलिसांना माहिती दिली.
पोलीसांनी शुभमचे मोबाईल लोकेशन चेक केले असता ते अर्धापुर तामसा बायपास रोडवरील
आर्यन बिअर बारचे जवळ असल्याचे समजले.

पोलीसांसह नातेवाईक घटना स्थळी गेले असता शुभम हा नरहरी मंगलकार्यालयच्या बाजुला झाडीमध्ये मृत आढळुन आला.
त्याच्या जवळ विषाचा डब्बा, पावती व चिठ्ठी आढळून आली.
अर्धापुर पोलीसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी विष्णुपुरी येथील सरकारी दवाखाना येथे दाखल केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil | काऊंटडाऊन सुरू! 2 दिवसात मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार का? मनोज जरांगे म्हणाले, मुख्यमंत्री दगाफटका…