Maratha Reservation Protest | मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांकडून हालचालींना वेग; समितीला अहवाल सादर करण्यासाठी एक आठवड्याचा वेळ

पोलीसनामा ऑनलाइन – Maratha Reservation Protest | मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Caste Certificate) देण्यात यावे आणि विदर्भाच्या पार्श्वभूमीवर मराठावाड्यातील मराठा समाजाला देखील आरक्षण द्यावे अशी मागणी उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केली आहे. यासाठी मागील 9 दिवसांपासून ते उपोषणावर बसले असून आता त्यांची तब्येत खालावली आहे. तरी देखील राज्य सरकारचा (State Government) जीआर येत नाही तो पर्यंत उपोषण न सोडण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देता येईल का यासाठी राज्य सरकारकडून अप्पर मुख्य सचिव महसूल यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. सरकराने समितीला अहवाल सादर करण्यासाठी महिनाभराची मुदत दिली होती. पण आंदोलन मागे घेत नसल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी समितीला एका आठवड्यामध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation Protest) ही बाब अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.

मराठा आंदोलकांवर जालना (Jalna) येथे झालेल्या लाठीचार्ज केल्याचे पडसाद राज्यभर उमटले. आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांदे यांनी उपोषण सुरु केले असून याला संपूर्ण मराठा समाजाचा पाठिंबा आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी उपोषणकर्ते करत आहेत. मराठा म्हणजे कुणबी आणि कुणबी म्हणजे ओबीसी असे मत मनोज जरांगे यांनी व्यक्त केले आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणे शक्य आहे का यासाठी राज्य सरकारने समिती स्थापन केली होती. समितीला अहवाल सादर करण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली होती. मात्र हे उपोषण अधिक तीव्र झाल्यामुळे लवकरात लवकर अहवाल सादर करावा असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. आता एका आठवड्याची मुदत या समितीला देण्यात आली आहे.

मराठवाड्यातील मराठा समाज कुणबी असल्याचा दावा उपोषणकर्ते करत आहेत.
त्यांचा समावेश आरक्षणामध्ये (Maratha Reservation Protest) करण्याची मागणी केली जाते आहे.
या मागणीच्या उत्तराच्या शोधासाठी राज्य सरकार थेट हैदराबादला (Hyderabad) गाठण्याच्या तयारीत आहे.
मराठवाड्यातील निजामाच्या काळात मराठा समाजाच्या नोंदी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशा करण्यात
आल्या असल्याचा दावा उपोषणकर्ते करत आहेत. याचा अभ्यास करण्यासाठी समिती तयार करण्यात आली असून आता
या प्रक्रियेला वेग येणार आहे. कुणबी मराठा जातीच्या नोंदी शोधण्यासाठी, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक पथक हैद्राबादला पाठवण्यात आले आहे. मराठवाड्यातील अनेक शेतकरी मराठा कुणबी आहेत. त्याच्या नोंदी तपासून आणि त्यावर अभ्यास करून अहवाल सादर केला जाणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation Protest | मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास ओबीसी संघटनांचा विरोध; राज्य सरकारला दिला इशारा

MHADA Pune Lottery | म्हाडातर्फे 5 हजार 863 सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरूवात

Pune Dahi Handi – Traffic Updates | पुण्यात दहिहंडी उत्सावानिमित्त वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग