Maratha Reservation | शाहू महाराजांच्या भेटीने जरांगेंना मिळालं बळ, सरकारला दिला इशारा – ”आता कुठलेही बहाणे न सांगता…”

जालना : Maratha Reservation | माझे सरकारला पुन्हा सांगणे आहे की विशेष अधिवेशन बोलावून, समितीचा प्रथम अहवाल घ्यावा. २००१ च्या कायद्यानुसार मराठा आरक्षण द्या. आधार म्हणून ज्या नोंदी मिळाल्यात त्या पुरेशा आहेत. आता कुठलेही बहाणे न सांगता महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा कायदा मंजूर करावा. अर्धवट आरक्षण (Maratha Reservation) आम्ही घेणार नाही, असा इशारा मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारला (State Govt) दिला आहे.

आज अंतरवाली सराटी येथे जाऊन शाहू महाराजांनी (Shahu Maharaj) मनोज जरांगे यांची भेट घेतली. यानंतर जरांगे म्हणाले, शाहू महाराज छत्रपती यांनी पाठिंबा दिल्याने लढ्याला हत्तीचे बळ मिळाले आहे. शाहू महाराज म्हणाले आम्ही तुमच्या बरोबर आहोत. मग आता तर आम्ही कुणाला भीतच नाही.

मनोज जरांगे म्हणाले, अर्धवट आरक्षण दिले तर तुम्ही मराठा बांधवांमध्ये भेद निर्माण केला आहे असा संदेश जाईल.
निजामकालीन दस्तावेज शोधा आणि महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या.
कारण आम्ही रक्ता-मासांचे नातलगही आहोत आणि भाऊ-भाऊही आहोत.
व्यवसायाच्या आधारावर सगळ्यांना आरक्षण (Maratha Reservation) दिले आहे तसेच आम्हाला द्यावे.

सरकारला इशारा देताना जरांगे म्हणाले, आम्हाला जर अर्धवट आरक्षण दिले तर ते तुम्हाला जड जाईल.
आज शाहू महाराज छत्रपती आले आहेत आमच्याकडे. आभार मानायला शब्द नाहीत.
सरकारने हे ओळखून घ्यावे की शाहू महाराजही जनतेसाठी इथे आले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर आरक्षण मंजूर करावे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | बारामतीत अजित पवारांच्या निवासस्थानी कडेकोट बंदोबस्त, मराठा आंदोलक आक्रमक झाल्याने खबरदारी

Maratha Reservation | मराठा आंदोलनाचे चटके जाणवू लागताच, मंत्रालयाबाहेर ३ आमदार बसले उपोषणाला; आरक्षणाची केली मागणी