Ajit Pawar | बारामतीत अजित पवारांच्या निवासस्थानी कडेकोट बंदोबस्त, मराठा आंदोलक आक्रमक झाल्याने खबरदारी

मुंबई/पुणे – Ajit Pawar | मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाला राज्यात अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. जालना, बीड, धाराशीव, लातूर, नंदूरबार, यवतमाळ, कोल्हापूर, सांगली, सातारा यासह अनेक ठिकाणी मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. आंदोलकांनी काही ठिकाणी राजकीय नेत्यांची निवासस्थाने, वाहने, संस्था यांना लक्ष्य केल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे. खबरदारी म्हणून राज्यातील मंत्र्यांच्या निवासस्थानांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. बारामतीमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निवासस्थानी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आणि दादांना डेंग्यू झाला, अशी टीका मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांची धाकटी सुकन्या पल्लवी जरांगे हिने काल केली होती. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Group) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी देखील अजित पवार यांच्यावर मराठा आंदोलन सुरू असताना अजितदादांना डेंग्यू झाल्याने टीका केली होती.

एकुणच काल यामुळे अजित पवार चर्चेत होते. दरम्यान, काल राज्यात काही ठिकाणी मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले. बीडमध्ये आंदोलकांनी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके (MLA Prakash Solanke) यांच्या बंगल्याच्या पार्किंगमध्ये गाड्यांची जाळपोळ केली, घरावर जोरदार दगडफेक केली. तसेच सोळंके यांच्या भावाच्या घरात देखील जाळपोळ केली होती.

जाळपोळीच्या घटना आणि राजकीय नेत्यांना आंदोलक लक्ष्य करत असल्याचे पाहून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांच्या निवासस्थानांच्या बंदोबस्तात वाढ केली आहे. (Ajit Pawar)

दरम्यान, या हिंसक घटनांवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पत्रकार परिषद नाराजी व्यक्त केली. तसेच जरांगे पाटील यांनीही आंदोलकांना शांततेचे आवाहन केले. मात्र, आंदोलक ठिकठिकाणी राजकीय नेत्यांकडे राजीनाम्याची मागणी करत आहेत.

राज्यातील ही स्थिती पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटी
येथे पोलिसांचा बंदोबस्त वाढवला आहे.

बारामतीपाठोपाठ आता दौंडमध्येही अजित पवारांना विरोध होताना दिसत आहे.
माळेगाव प्रमाणेच दौंड तालुक्यातील दौंड शुगर येथे अजित पवारांना मोळी पुजनाला बोलावू नका, अशी भूमिका
मराठा क्रांती मोर्चा घेऊन त्याबाबतचे पत्र पोलिसांना दिले आहे.

या नेत्यांचा बंदोबस्त वाढवला

  • आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक आक्रमक झाल्याने अर्जुन खोतकरांच्या जालन्यातील घराची सुरक्षा
    वाढवली आहे.
  • भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरातील निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
  • जालन्यातील संभाजीनगरमधील रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.
  • नारायण राणेंसह सर्वच महत्वाचे मंत्री आणि नेत्यांच्या घरांभोवती पोलिसांचा बंदोबस्त वाढवला आहे.
  • मुंबईतल्या अजित पवार गटाच्या प्रदेश कार्यालयाला सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.
    या परिसरात दंगल नियंत्रण पथक तैनात केली आहे.
  • नागपूरमधील मंगलम कॉम्प्लेक्स येथील भाजप कार्यालयाची सुरक्षा वाढवली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Lalit Patil Drugs Case | ड्रग्स माफिया ललित पाटीलचा पुणे पोलिसांना मिळाला ताबा

Pune Drug Case | ड्रग्ज रॅकेट प्रकरण : ससून आणि कारागृह प्रशासन आले ताळ्यावर, कैदी रुग्णांचे प्रमाण अचानक झाले कमी