Maratha Reservation | मराठा आंदोलनाचे चटके जाणवू लागताच, मंत्रालयाबाहेर ३ आमदार बसले उपोषणाला; आरक्षणाची केली मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मागील दोन महिन्यांपासून राज्यात मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलन जोर धरत होते. आता हे आंदोलन निर्णायक टप्प्यात आले असून आक्रमक झाले आहे. संतप्त आंदोलकांनी कालपासून राजकीय नेत्यांना लक्ष्य करण्यास सुरूवात केल्याने अनेकांच्या झोपा उडाल्या आहेत. कालपर्यंत सर्वच आमदार, खासदार चार हात लांब राहून आंदोलनाकडे पहात होते. मात्र, आता समाजाची तीव्र भावना पाहून आमदार, खासदार राजीनामे देऊ लागले आहेत. विशेष म्हणजे आजपासून मंत्रालयाबाहेर (Ministry) तीन मराठा आमदार उपोषणाला बसले आहेत. (Maratha Reservation)

मराठा आंदोलनाची धग जाणवू लागल्याने काही आमदार आणि खासदारांनी आपला राजीनामा दिला आहे. तर, काहींना मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे.

दरम्यान आज मराठा समाजातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील (NCP) पारनेरचे आमदार निलेश लंके (MLA Nilesh Lanke), शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Group) आमदार कैलास पाटील (MLA Kailas Patil) आणि आमदार राजू नवघरे (MLA Raju Navghare) यांनी मंत्रालयाबाहेर उपोषण सुरू केले आहे.

मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनात दीडशेहुन अनेक गावांत राजकीय नेते आणि मंत्र्यांना गावबंदी
करण्यात आली आहे. यामुळे अनेक मंत्र्यांचे दौरे आणि कार्यक्रम रद्द झाले आहेत. त्यांना बाहेर पडणे अवघड होऊन बसले आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता आमदारांनीच लाक्षणिक उपोषण सुरू केल्याने आरक्षणाचा हा लढा जास्त तीव्र
झाला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आवाहन केले आहे की, राज्यातील जे ६-७ केंद्रीय मंत्री
आणि ४८ खासदारांनी एकजुटीने राजीनामा द्यावा.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Lalit Patil Drugs Case | ड्रग्स माफिया ललित पाटीलचा पुणे पोलिसांना मिळाला ताबा

Pune Drug Case | ड्रग्ज रॅकेट प्रकरण : ससून आणि कारागृह प्रशासन आले ताळ्यावर, कैदी रुग्णांचे प्रमाण अचानक झाले कमी