Devendra Fadnavis | “अगर ऐसे ही सिलेक्टीव्ह चीज़े पढ़ते रहोगे तो… “; ट्विट करून घेतला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींचा धडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांनी परवाच्या त्यांच्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकरांवर (Swatantryaveer Savarkar) भाष्य केले होते. बिरसा मुंडा (Bursa Munda) यांनी ब्रिटिशांपुढे (British) शरणागती पत्करली नाही परंतु स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटिशांकडे माफीनामा करून स्वतःची सुटका करून घेतली. त्यांनी इतर स्वातंत्र्य सैनिकांना धोका दिला, अशा प्रकारचे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते. त्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस (BJP Leader Devendra Fadnavis) यांनी त्यांच्यावर टीका केली. त्याला प्रतिउत्तर म्हणून राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत सावरकरांच्या पत्राची प्रत सादर केली आणि ती देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) वाचावी असे राहुल गांधी म्हणाले होते.

 

या नंतर हे प्रकरण भलतेच तापले आणि महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर राहुल गांधींच्या विधानावर विविध प्रतिक्रिया आल्या. त्यानंतर महाविकास आघाडीतील त्यांचे सहकारी शिवसेनेने (Shivsena Uddhav Group) या वक्तव्यापासून स्वतःला लांब करून घेतले तर राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांनीही (NCP Chhagan Bhujbal) राहुल गांधीना हा मुद्दा टाळता आला असता असे वक्तव्य केले होते. मात्र देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) राहुल गांधींवर घणाघाती हल्ला चढवला आहे. फडणवीसांनी एक ट्विट मालिका (Twitter Thread) लिहीत राहुल गांधींना अनेक प्रश्न विचारले आहेत.

 

पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) एका पत्राचा दाखल देत राहुल गांधींना त्या पत्राच्या शेवटच्या ओळी वाचण्यास लावल्या आहेत. या पत्रात महात्मा गांधी वीर सावरकरांप्रमाणेच इंग्रजांच्या लिहिलेल्या पत्रात इंग्रजांचा प्रामाणिक नोकर राहण्याचे वचन देत आहेत. देवेंद्र फडणवीस लिहितात, “राहुल जी, कल आपने मुझे एक पत्र की अंतिम पंक्तियाँ पढ़ने को कहा था, चलो, अब कुछ दस्तावेज़ आज मैं आपको पढ़ने देता हूँ। हम सब के आदरणीय महात्मा गांधी जी का यह पत्र आपने पढ़ा? क्या वैसी ही अंतिम पंक्तियाँ इस में मौजुद है, जो आप मुझे पढ़वाना चाहते थे?(राहुल जी काल तुम्ही मला एका पात्राच्या शेवटच्या ओळी वाचायला लावल्या चला आज मी तुम्हाला काही कागदपत्र वाचायला देतो. महात्मा गांधींचे हे शेवटचे पात्र तुम्ही वाचले का? या अगदी तशाच ओळी आहेत ज्या तुम्ही मला वाच्चयला लावल्या होत्या.)

 

त्यानंतर त्यांनी इंदिरा गांधींच्या पत्राचा दाखल देत इंदिरा गांधींनी (Indira Gandhi) सावरकरांना स्वातंत्र्य लढ्याचे आधारस्तंभ म्हणाल्याची आठवण करून दिली.
पुढच्या ट्विट मध्ये त्यांनी शरद पवारांच्या (Sharad Pawar) पत्राचा दाखल दिला.
पुढे पी व्ही नरसिम्हाराव (P V Narsimharao) यांच्यानुसार सावरकर एक प्रखर राष्ट्रवादी होते आणि त्यांच्या
पासून तरुणांना खूप काही शिकवते, हे दाखवणारे ट्विट केले. असे अनेक दाखले देत देवेंद्र फडणवीसांनी
राहुल गांधींचा चांगलाच धडा घेतला आहे.

 

Web Title :- Devendra fadnavis | devendra fadnavis answer rahul gandhi over savarkar remark mentioning sharad pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Indrani Balan Winter T20 League 2022 | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा

Inflation | सोने-चांदी आणि पामतेल पुन्हा एकदा महागले

Pune-Goa Road Accident | पुण्यातील बुलेट रायडर तरुणाचा मुंबई-गोवा महामार्गावर अपघाती मृत्यू