Marathi Actress Sonali Kulkarni | मराठमोळी ‘हि’ अभिनेत्री आपल्या नवऱ्याबरोबर रमली शेतात, Video झाला व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन टीम – अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला (Marathi Actress Sonali Kulkarni) तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा अशी ओळख मिळाली आहे. अभिनेत्री सोनाली तिच्या चित्रपटातल्या अभिनयातून त्याच बरोबर फोटोंमधून नेहमीच चर्चेत असते. सध्या ती कुटुंबीयांसोबत पंजाब (Punjab) मध्ये गेली आहे. तेथील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Marathi Actress Sonali Kulkarni)

 

या व्हिडिओमध्ये सोनाली आपल्या नवऱ्यासोबत शेतात ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे. (Sonali Kulkarni Enjoying Tractor Ride With Husband) हा व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शन मध्ये म्हटले की, “घर की खेती गेहू …… कुणालला आमचे शेत बघण्याची इच्छा होती त्यामुळे आम्ही याचा आनंद घेत आहोत”. अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या व्हिडिओमध्ये ती ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे. त्याचबरोबर तिचा पती देखील तिच्यासोबत दिसत आहे. या आधीच सोनालीने पंजामध्ये वाघा बॉर्डरला भेट दिल्यानंतरचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. ते चाहत्यांना खूपच आवडले होते. या फोटोजनंतर आता सोनालीचा हा ट्रॅक्टरचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ गाजवत आहे.

 

सोनालीचा नवरा कुणाल बेनोडेकर (Kunal Benodekar) हा दुबईत (Dubai) स्थायिक असतो.
नुकताच त्यांचा विवाह सोहळा लंडन (London) येथे थाटामाटात पार पडला.
तर दुबईत साखरपुडा देखील जोरात पार पडला होता. ‘बकुळा नामदेव घोटाळे’ (Bakula Namdev Ghotale)
या चित्रपटातून सोनालीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.
मराठी सोबतच हिंदी चित्रपट सृष्टीत देखील तिने आपले नाव कमावले आहे.
सोनाली मुळची पुण्याची (Pune) असून तिची आई पंजाबी असून वडील लष्करात होते.

 

Web Title :- Marathi Actress Sonali Kulkarni | marathi actress sonali kulkarni enjoying tractor ride with husband in farming

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Mumbai High Court | ‘न्यायालयाच्या दीर्घकालीन सुट्ट्या कमी करण्याची अपेक्षा योग्य असली, तरी…’ – जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालय

Gold and Silver Price | सोने पुन्हा महागले, पहा तुमच्या शहरातील किंमती

Actress Sunny Leone | अभिनेत्री सनी लिओनीने ठोठावले केरळ उच्च न्यायालयाचे दरवाजे, जाणून घ्या नेमक काय आहे प्रकरण?

Kieron Pollard IPL Retirement | कायरन पोलार्डची IPL मधून निवृत्ती; आता मुंबई इंडियन्सच्या संघामध्ये पार पाडणार ‘ही’ जबाबदारी