प्रिया बापट झळकणार वेबसीरिज  मध्ये 

मुंबई  : वृत्तसंस्था – हिंदी मराठी सिनेमा, मालिका आणि नाटक अश्या तिन्ही क्षेत्रात झळकलेली मराठमोळी अभिनेत्री  म्हणजेच  प्रिया बापट. आपल्या अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले आहे. प्रिया पुन्हा एकदा वेबसीरिज च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे  प्रिया बापटने या आधी मराठीमध्ये टाईमपास -२, वजनदार, आम्ही दोघी, ,हॅप्पीजर्नी सारख्या चित्रपटात तर  मुन्नाभाई एम. बी. बी. एस  आणि लगे रहो मुन्ना भाई सारख्या चित्रपटात आपला अभिनय तिने दाखवला आहे.

प्रियाच्या येणाऱ्या  वेबसीरिज  चे नाव ‘मायानगरी सिटी ऑफ ड्रीम्स’ असे आहे या वेबसीरिज ची निर्निती समीर नायर यांच्या अप्लॉज एंटरटेन्मेंटने केली आहे या वेबसीरिज च दिग्दर्शन नागेश कुकुनूर यांनी केले असून. यात प्रियाने कणखर, महत्वाकांक्षी असलेल्या पौर्णिमा गायकवाड या मुलीची व्यक्तिरेखा साकारली आहे.

प्रियाने तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असे लिहले आहे की मी’ मायानगरी सिटी ऑफ ड्रीम्स’  सीरिज बाबत खूप उत्सुक आहे  आणि ही वेब सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.