बुलेटसाठी विवाहितेचा केला छळ, पतीसह 5 जणांवर गुन्हा

मालेगाव : पोलीसनामा ऑनलाइन – किरकोळ कारणावरून वाद घालून विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करणा-या तसेच बुलेट घेण्यासाठी माहेरहून 1 लाख रुपये घेऊन ये छळणा-या पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी सारिका किशोर भगणे (वय 29, रा. नगर, हल्ली रा. टेहरे) या विवाहितेने छावणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार विवाहितेचा पती किशोर भगणे, सासरे विठ्ठल भगणे, सासू, नणंद याच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

छावणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहितेचा आठ वर्षापूर्वी किशोर भगणे यांच्यासोबत विवाह झाला होता. विवाह झाल्यापासून पती, सासरे, सासू, नणंद किरकोळ कामावरून वाद घालून शिवीगाळ व मारहाण करीत. तसेच विवाहितेच्या पतीला बुलेट घेण्यासाठी माहेरून एक लाख रुपये घेऊन ये म्हणून छळ करत असत. पैसे आणले नाहीत, तर जिवंत जाळून टाकण्याची धमकी असल्याची तक्रार विवाहितेने दिली आहे. या प्रकरणी पतीसह सासरकडील पाच जणांविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात विवाहितेच्या छळाचा गुन्हा दाखल झाला.