Maruti Suzuki Alto 2020 लॉन्च ! BS6 इंजनची ही कार देते 31 KM हून जास्त ‘मायलेज’, जाणून घ्या

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – नुकतेच मारुती सुझुकीने आपली प्रसिद्ध कार ऑल्टो सीएनजीचे दोन वेगवेगळ्या वेगळ्या प्रकारांमध्ये लॉंचिंग केले आहे. कारच्या इंजिनाला BS6 इंधन उत्सर्जन प्रमाणे अपडेट करण्यात आले आहे.

किती असेल मायलेज ?
कार निर्मात्यांचे म्हणणे आहे की सीएनजी मॉडेल ऑल्टो BS6 31.59 किमी प्रति किलोग्राम मायलेज देते. मारुती सुझुकी एस-सीएनजी दोन ईसीयू (इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट) आणि इंटेलिजेंट इंजेक्शन सिस्टमसह सुसज्ज आहे. सर्व प्रकारच्या क्षेत्रात चांगली कामगिरी करण्यासाठी वाहने पूर्णपणे ट्यून केली जातात आणि कॅलिब्रेट केली जातात.

आम्ही वारंवार गाडीमध्ये असे बदल करत आहोत जे की आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित असतील आणि पर्यावरण पूरक असतील अशी माहिती कंपनीचे अधिकारी शशांक श्रीवास्तव यांनी दिली आहे.

पावर
Maruti Alto मध्ये 796cc चे इंजिन देण्यात आले आहे. CNG मोडमध्ये हे इंजिन 40.36 bhp ची पावर 60 Nm टॉर्कची निर्मिती करते. पेट्रोलवर चालल्याने हे इंजिन 47.33 bhp ची पावर 69 Nm टॉर्कची निर्मिती करते. यामध्ये 5-स्पीड मॅन्युअल गेअर बॉक्स दिला आहे.

फीचर्स
पावर स्टिअरिंग, फ्रंट पावर विंडो दिले गेले आहे तसेच इंटिरिअरमध्ये दरवाजा हॅण्डलला सिल्व्हर फिनिश आणि ड्युअल टोन समवेत अनेक फीचर्स आहेत. एक्सटीरियरमध्ये व्हील कवर्स आणि बॉडी कलर बम्पर्स आणि डोअर हँडल्स मिळतात. सुरक्षिततेसाठी यात ड्युअल एअरबॅग, एबीएस विथ ईबीडी, सीट बेल्ट रिमाइंडर, हाय-स्पीड अलर्ट आणि मागील पार्किंग सेन्सर्स देण्यात आलेले आहेत.

किती असले किंमत ?
या नव्या कारची दिल्लीमध्ये शोरूम किंमत 4,32,700 रुपयांपासून सुरु होते.
Alto BSVI LXi S-CNG: 432,700 रुपये
Alto BSVI LXi (O) S-CNG: Rs 436,300

फेसबुक पेज लाईक करा