Maval Loksabha Constituency | मावळात ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश, श्रीरंग बारणेंनी केले स्वागत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- लोकसभा निवडणुकीमुळे (Maharashtra Loksabha 2024) राजकीय वातावरण तापू लागले असतानाच दुसरीकडे या पक्षातून त्या पक्षात जाणाऱ्यांचे पक्षप्रवेश देखील वाढले आहेत. आज मावळ मतदारसंघातील (Maval Loksabha Constituency) काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे (Shiv Sena Srirang Barane) यांच्या उपस्थितीत शिंदे सेनेत प्रवेश केला. यावेळी बारणे यांनी त्यांचे स्वागत केले.

मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून (Mahayuti) श्रीरंग बारणे तर महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Group) संज्योग वाघेरे हे उमेदवार आहेत. ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी ही लढत आहे. येथे आता प्रचार रंगत चालला असून पक्षप्रवेश देखील सुरू आहेत.

मावळमधील काळेवाडी येथे महायुतीच्या मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
खासदार बारणे यांनी आपल्या जुन्या सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले.

ठाकरे गटाचे मावळ उपतालुकाप्रमुख आणि माजी सरपंच चंद्रकांत भोते, ओव्हळे गावचे विद्यमान उपसरपंच समीर कराळे,
शाखाप्रमुख विजय भोते, माजी सरपंच मनोहर भोते, गणेश भोते, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र भोते, नवनाथ भोते,
उबाठा परंदवडी शाखाप्रमुख विकास जगदाळे, गणेश भोते, कचरेवाडी येथील संतोष कचरे, मधुकर कचरे,
रामदास कचरे आदींसह महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनीही शिंदे गटात प्रवेश केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Crime Branch | पिंपरी : कामगारांनीच चोरले कंपनीतील इम्पोर्टेड रबरी पार्ट, गुन्हे शाखेकडून आरोपी गजाआड; पावणे सात लाखांचा मुद्देमाल जप्त

Adani Group Entry In Pune | अदानी समुहाची पुण्यातील पिंपरीमध्ये मोठी गुंतवणूक, ‘या’ उद्योगासाठी फिनोलेक्सकडून २५ एकर जमीनीची खरेदी

Pimpri Cheating Fraud Case | पिंपरी : दुकाने व सदनिकांचा ताबा न देता सव्वा तीन कोटींची फसवणूक, दोघांवर गुन्हा दाखल

Pune Lok Sabha Election 2024 | सोशल मीडिया आणि भेटीगाठींवर भर देत मुरलीधर मोहोळांचा जोरदार प्रचार, म्हणाले -”पुण्याला देशातील सर्वोत्कृष्ट…”