पुण्यातून लोकसभा निवडणुकीसाठी सुरेश कलमाडी ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कॉंग्रेस पक्षाकडून माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्यावरील निलंबन कारवाई मागे घेतली जाऊ शकते आणि कदाचित लोकसभा उमेदवारीसाठी त्यांचा विचार होवू शकतो, अशा आशयाचे विधान काँग्रेस पक्षाच्या सह प्रभारी सोनल पटेल यांनी केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. लोकसभेची निवडणूक अगदी काही महिन्यांवर येवून ठेपली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षातील मोहन जोशी, अभय छाजेड, आमदार अनंत गाडगीळ, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, संजय बालगुडे, कमलताई व्यवहारे आदी इच्छुक सक्रीय झाले आहेत.

देशातील मंदिरे भाजपच्या मालकीची आहेत का ? : राहुल गांधी 

प्रत्येकाने जनसंपर्क मोहीम आपापल्या परीने हाती घेतली आहे. अशातच कलमाडी यांच्या नावाचा उल्लेख पक्षाच्या सह प्रभारी या महत्त्वाच्या पदावरील व्यक्तिने केला. अर्थातच त्यामुळे राजकीय क्षेत्र ढवळून निघाले आहे. कलमाडी पक्षाबाहेर असले तरी त्यांना मानणारा एक वर्ग काँग्रेस पक्षात आहे. या वर्गाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

पुणे शहर लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दावा करीत आहे. काँग्रेसकडे उमेदवार कोण ? आणि काँग्रेस पेक्षा राष्ट्रवादीची ताकद जास्त असल्याचा त्या पक्षाचा दावा आहे. कलमाडींसह अन्य इच्छुकांची नांवे पुढे आल्यावर राष्ट्रवादीचा दावा कितपत टिकेल ?असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान काँग्रेस पक्षातील घडामोडींकडे भाजपचे लक्ष वेधले गेले आहे.