काय सांगता ! होय, गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी महापौरांनीच तोडला Lockdown

लंडन : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन लागू केला आहे. सर्वसामान्यांना आपल्या दैनंदिन कामासाठीही बाहेर पडणं अशक्य झालं आहे. अशात आता महापौरांनीच फक्त आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी लॉकडाऊनचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळे त्यांना आता टीकेला सामोरं जावं लागत आहे.

लिसेस्टर सिटीचे महापौर सर पीटर सोल्सबी यांनी लॉकडाऊनचं उल्लंघन केलं आहे. 71 वर्षाचे सर पीटर हे लेबर पार्टीचे महापौर असून त्यांनी 64 वर्षाय गर्लफ्रेंड समर्सलँडच्या घरी ते येता जाताना दिसून आले. ते फक्त तिला भेटायला येत नसत तर रात्रभर तिथंच राहात असत. असं एक दोन दिवस नाही तर तब्बल 2 महिने त्यांनी असे केले. एप्रिल आणि मे महिन्यात सोल्सबी समर्सलँडच्या घरी वारंवार येत असल्याचे दिसून आले. तिच्या घराची डागडुजीही त्यांनी केली. समर्सलँडच्या शेजाऱ्यांनी महापौर तिच्या घरी येत असल्याचे पाहिले होते.

शेजाऱ्यांनी याचे फोटो काढले. एका फोटोत तर सॉल्सबी आपल्या गर्लफ्रेंडच्या घराच्या खिडकीजवळ शिडी लावून उभे होते. या फोटोत ते आपल्या गर्लफ्रेंडसोबत बोलत असल्याचे दिसले. विशेष म्हणजे लेबर पार्टीचे नेते पूर्ण मे महिना आपल्या सोशल मीडियावर लोकांना घरी सुरक्षित राहण्याचे संदेश देत होते आणि तेच आपलं घर सोडून दुसऱ्याच्या घरी जात होते. ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. त्यानंतर पोलिसांनी महापौरांना समज देऊन त्यांना आपल्या घरी राहण्यास सांगितलं.

दरम्यान, या प्रकरणाविषयी प्रसार माध्यमांनी त्यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले की, माझ्या अशा व्यवहारामुळे कुणाला कोरोना व्हायरसची लागण होऊ शकते असा दावा कुणी करू शकेल, असे मला वाटत नाही. मी जे काही केलं ते लॉकडाऊनच्या नियमांच्या विरोधात नक्कीच आहे मात्र नियमांच्या विरोधात अजिबात नाही.