‘अभिनेत्री होण्यासाठी कोणासोबत अय्याशी केली नाही’, तनुश्री दत्ता पुन्हा एकदा संतापली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवू़ड अ‍ॅक्ट्रेस तनुश्री दत्तानं अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर विनयभंगाचा आरोप केल्यानंतर सगळीकडे खळबळ उडाली होती. परंतु यातून नाना पाटेकरांना क्लीन चीट मिळाली होती. यानंतर पुन्हा एकदा नाना पाटेकर यांच्यावर ती भडकल्याचं दिसत आहे. अभिनेत्री होण्यासाठी मी कोणासोबत अय्याशी केली नाही असं ती म्हणाली आहे. एका मुलाखतीत ती बोलत होती. यावेळी तिनं अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.

तनुश्री म्हणाली, “नाना पाटेकर यांच्यावर मी टू मोहिमेअंतर्गत मी आवाज उठवला होता. बऱ्याच अभिनेत्रींनी मला पाठिंबा दिला. त्यांनी ट्विटरवरून माझं समर्थन केलं. परंतु ट्विट करून परिस्थिती बदलत नाही. ज्यावेळी या ओळखीच्या अभिनेत्रींच्या ओळखीच्या दिग्दर्शकाचं नाव या माहिमेत आलं तेव्हा त्यांनी माझ्याकडे पाठ फिरवली.”

पुढे बोलताना तनुश्री म्हणते, “मी नाना पाटेकर यांना कधीही माफ करू शकत नाही. त्यांच्यामुळे माझं करिअर उध्वस्त झालं आहे. मोठ्या मेहनतीनं मी करिअर घडवलं होतं. कधीही कमासाठी कोणाची हाजी हाजी केली नाही. अभिनेत्री होण्यासाठी मी कोणासोबत अय्याशी केली नाही. मी सर्वकाही माझ्या हिंमतीवर केलं. नानांमुळं माझं करिअर उध्वस्त झालं.” असंही ती म्हणाली.