आता महाराष्ट्रात ड्रोनने होणार रुग्णांना रक्तपुरवठा

नागपूर :  पोलीसनामा ऑनलाईन 

वेळेत रक्त उपलब्ध न झाल्याने अनेक रुग्णांना आपला जीव गमावावे लागतो . याच गोष्टीच गांभीर्य लक्षात घेत नागपूरच्या तीन तरुणांनी मेडिकल ड्रोनद्वारे रक्तपुरवठा करण्याच तंत्रज्ञान विकसित केलं आहे . ड्रोनद्वारे रक्तपुरवठा करणारी सेवा लवकरच महाराष्ट्रात सुरू होणार आहे. तसं झाल्यास ही सेवा आरोग्यसेवेतील एक देवदूतच ठरेल . रिषभ गुप्ता , अंशुल शर्मा, अरुणाभ भट्टाचार्य या नागपूरच्या तीन इंजिनीअर तरुणांना मेडिकल ड्रोनची कल्पना सुचली . नागपूर येथे या तरुणांनी थेट ड्रोनद्वारे ग्रामीण भागातील गरजूंना रक्त पुरवण्यासाठी लॉजिस्टिक कंपनी सुरु केली.

रक्त पोहचवणाऱ्या या ड्रोनचं नेपाळच्या अन्नपूर्णा डोंगराळ प्रदेशातून पोखराच्या ग्रामीण भागात आणि ग्रामीण कर्नाटकाच्या चित्रदुर्गा येथे यशस्वी टेस्टिंग करण्यात आलं आहे. ब्लडस्ट्रीम नावाच्या कंपनीने लाईफलाईन ब्लड बँकेसह ही सेवा उपलब्ध करून द्यायचा करार केला आहे. या सेवेचा विशेषतः फायदा ग्रामीण भागातील तसेच डोंगराळ भागळतील दुर्गम प्रदेशातील लोकांसाठी करता येईल .

‘या’ कारणामुळे सारा तेंडुलकरचा ‘तो’ फोटो झाला व्हायरल

अमेरिकेसह इतर काही प्रगत राष्ट्रांमध्ये मेडिकल ड्रोनला परवानगी मिळाली आहे. भारतात हा प्रयोग यशस्वी झाल्यास दुर्गम भागात राहणाऱ्या गरजूंना आरोग्य सुविधा वेळेवर मिळू शकतील . त्यामुळे ही ड्रोन सेवा आरोग्य क्षेत्रात मैलाचा दगड ठरेल .

असा आहे मेडिकल ड्रोन

इलेक्ट्रिक चार्जरवर चालणाऱ्या या ड्रोनचं वजन ९ किलो आहे. त्यातून दीड किलो औषधं पोहचवली जाऊ शकतात. तितक्याच वजनाच्या रक्ताच्या पिशव्या नेता येणंही शक्य आहे. ड्रोन १०० मीटर उंचीवर उडते.एकदा इलेक्ट्रिकवर चार्ज केलं की, ड्रोन १०५ किलोमीटर प्रवास करतो. रक्ताच्या पिशव्या खाली टाकण्यासाठी हे ड्रोन ३० मीटर खाली येते. पिशवीला खाली पडताना पॅरॉशूट घेऊन जाते.विशेष म्हणजे पाऊस आणि वाऱ्याचा ड्रोनवर काहीही परिणाम होत नाही.

[amazon_link asins=’B009WNA9V6,B01LXDUDDQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bc0d2f0f-b292-11e8-bc72-0548230e60e0′]