लॉकडाऊनमध्ये जुळया मुलांचा जन्म झाल्यानंतर आईनं ठेवली ‘अशी’ नावं

मेरठ : पोलिसनामा ऑनलाइन – देशात कोरोना संसर्गाचे संकट असताना मेरठमध्ये एका महिलेनं जुळ्या बाळांना जन्म दिला आहे. यामध्ये मजेशीर गोष्ट अशी की, या महिलेनं आपल्या मुलांची नावं क्वारंटाईन (Quarantine) आणि सॅनिटायजर (Sanitizer) असं ठेवण्यात आली आहे.

मेरठमधील मोदीपुरम भागातील पाबरसा येथे राहणाऱ्या वेणू आणि धर्मेंद्र या दाम्पत्यांची ही मुलं चर्चेचा विषय बनला आहे. त्याचं म्हणणे आहे की, क्वारंटाईन आणि सॅनिटायझर त्यांच्या जीवनाचा एका महत्वाचा भाग बनलं आहे. या दोन्ही गोष्टी आपल्याला कोरोना संसर्गापासून वाचवतात. यामुळे ही सुरक्षतेची भावना कायम रहावी यासाठी त्यांनी आपल्या जुळ्या मुलांचे नाव क्वारंटाईन आणि सॅनिटायझर ठेवलं आहे. वेणू यांनी म्हटलं की, प्रसूती काळात त्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. त्यांची कोव्हिड चाचणीही करण्यात आली होती. परंतु, अशा वेळी सुद्धा डॉक्टरांनी त्यांची प्रसूती करण्यात तयारी दर्शविली नाही. तेव्हा डॉ. प्रतिमा तोमर यांनी साथ दिली. त्यांच्यामुळे त्यांची सुरक्षित प्रसूती झाली. यादरम्यान त्यांनी आपल्या मुलांची नाव क्वारंटाईन आणि सॅनिटायझर ठेवण्याचा निश्चय केला.

यापूर्वी देखील जुळ्या मुलाचं नाव ठेवलं होत कोरोना आणि कोव्हिड

जगभरात एकीकडे कोरोना संसर्गामुळे चिंतेचं वातावरण असताना विनय वर्मा यांच्या घरामध्ये आनंदाचे वातावरण होते. कारण त्यांच्या पत्नीने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. प्रीती वर्मा असं त्या मुलांच्या आईच नाव असून त्यांनी सांगितलं, “संपूर्ण देश कोरोना संसर्गाविरुद्ध लढत आहे. प्रत्यके व्यक्ती घरामध्ये कैद आहे. अशा स्थितीत २७ मार्चची रात्र माझ्यासाठी खूप महत्वाची होती. एकीकडे जिथे लोक कोरोना संसर्गामुळे त्रस्त आहेत, दुसरीकडे आमच्या घरात जुळ्या मुलांचा जन्म झाला. म्हणूनच आम्ही ठरवलं की आपल्या मुलीचे नाव कोरोना आणि मुलाचं नाव कोव्हिड असं ठेवायचं.