PFI च्या ‘या’ मास्टरमाइंड सदस्याला अटक, ‘CAA’ च्या निषेधार्थ दिला होता ‘निधी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात २० डिसेंबर ला बिजनोर येथे निषेध करण्यात आला या निषेधाने हिंसक वळण घेतल्याने मोठ्या प्रमाणात सरकारी मालमत्तेबरोबर खाजगी मालमत्तेचे नुकसान झाले. या निषेधानंतर समोर आले की प्रदर्शनकाऱ्यांना भडकावण्यासाठी पीएफआयने काही लोकांना पैसे दिले होते. या प्रकरणी बिजनोर येथील पोलिसांनी ३ फेब्रुवारीच्या दिवशी चार लोकांना चांदपूर पोलीस स्टेशन परिसरातून अटक केली होती. दरम्यान बुधवारी या प्रकरणाशी संबंधित असलेल्या पीएफआयचा एक मास्टरमाइंड सदस्य शोएब याला पोलिसांनी अटक करून कारागृहात पाठवले होते.

२० डिसेंबर रोजी या कायद्याविरोधात झालेल्या निषेध प्रकरणी पोलिसांनी जवळपास ८० लोकांना अटक केली आहे. तसेच १५० लोकांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या हिंसक निषेध प्रकरणी पीएफआयचे नाव समोर आले होते ज्यामध्ये देशविरोधी पत्रके आणि लोकांना भडकावण्यासाठी निधी देण्यात आला असल्याचे समोर आले होते.

या प्रकरणी बुधवारी पोलसांनी बिजनोरच्या जुलाहान इलाक्यात राहणाऱ्या शोएब नामक तरुणास अटक केली आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की अटक करण्यात आलेला तरुण हा या घटनेचा मास्टरमाइंड आहे. या तरुणानेच लोकांना भडकावले आणि भडकावणारे पत्रके लावली असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच हा तरुण २०१७ पासून पीएफआयचा सक्रिय सदस्य आहे असे देखील सांगण्यात आले.