Mercury Transit 2020 : बुध ग्रहाचे वृश्चिकमध्ये गोचर, ‘या’ 5 राशींना ‘लाभच लाभ’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बुध एक तटस्थ ग्रह आहे आणि तो ज्या ग्रहासोबत राहतो त्यास लाभ देतो. कुंडलीत कमजोर स्थितीत असेल तर बुध अनेक समस्या आणतो. जर बुध प्रबळ असेल तर व्यक्तीच्या जीवनात कोणतीही समस्या येत नाही. 28 नोव्हेंबरला बुध गोचर होईल. बुध या दिवशी सकाळी 6:53 वाजता वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे आणि 17 डिसेंबरपर्यंत याच राशीत राहणार आहे. यानंतर बुध धनू राशीत जाईल. बुधाचे हे गोचर कोणत्या राशींसाठी लाभ घेऊन येत आहे, ते जाणून घेऊयात…

 मेष –

बुधाचे हे गोचर मेष राशीसाठी अनेक अडचणी घेऊन येत आहे. या गोचरच्या दरम्यान तुम्हाला तुमच्या वाणीवर खूप लक्ष द्यावे लागेल, अन्यथा तुम्ही एखाद्या मोठ्या अडचणीत फसू शकता. तुमचे शब्द तुमच्या कुटुंबातील वातावरण खराब करू शकतात. कामाच्या ठिकाणीसुद्धा तुमची कामगिरी चांगली राहणार नाही. प्रयत्नांमध्ये यश न मिळाल्याने हताश होऊ शकता आणि तणावात येऊ शकता. या काळात संयमाने काम घेण्याची गरज आहे. कोणतेही काम घाईघाईत करू नका. धैर्य ठेवा आणि योग्य वेळेची वाट पाहा. या गोचर दरम्यान कोणत्याही प्रकारचा प्रवास करू नका, अन्य नुकसान होऊ शकते.

वृषभ –

बुधाचे गोचर वृषभ राशीसाठी खूप चांगले परिणाम घेऊन येत आहे. कुटुंबाशी असलेले आपले संबंध पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. व्यवसाय किंवा भागीदारीशी संबंधित लोकांसाठी हा काळ खूप अनुकूल ठरणार आहे. हे गोचर त्यांच्यासाठी मोठे लाभ घेऊन आले आहे. कार्यक्षेत्रात मान सन्मान मिळेल आणि प्रशासकीय क्षमतांमध्ये वाढ होईल. हे गोचर तुमचे नाते आणि प्रेमसंबंधासाठी खूप चांगले आहे.

मिथुन

या गोचर दरम्यान आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागेल. खूप सावधगिरीने गाडी चालवा, अन्य अपघात होऊ शकतो. त्वचा आणि पोटाशी संबधित काही अडचणी त्रास देऊ शकतात. कार्यक्षेत्रात पहिल्यापेक्षा जास्त मेहनत करावी लागेल.

मात्र, या दरम्यान तुमचे सीनियर्स कामाची प्रशंसा करतील आणि प्रत्येकवेळी तुमच्या सोबत उभे राहतील. गोचर दरम्यान शत्रूंपासून सावध राहण्याची गरज आहे. या काळात कोणत्याही प्रकारचे कर्ज घेऊ नका. कोणताही निर्णय घाईत घेऊ नका.

कर्क

बुधाचे गोचर तुमच्यासाठी संमिश्र आहे. परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. रचनात्मक आणि कला क्षेत्राशी संबंधित लोकांना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. मोठ्या कालावधीपासून नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर आता यामध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. जुगारापासून दूर राहा. तुमच्या खराब वाणीमुळे नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो. यासाठी काहीही बोलताना शब्दांकडे लक्ष द्या. जोडीदाराशी नाते मजबूत राहील.

सिंह

या गोचर काळात सिंह जातकांसाठी शुभ परिणाम मिळू शकतात. यादरम्यान काही नवीन शिकाल आणि काही नवीन अनुभव घ्याल. कार्यक्षेत्रात वरिष्ठांकडून कौतुक होईल आणि प्रत्येक पावलावर तुमची साथ देतील. कामाच्या ठिकाणी कामगिरी चांगली होईल आणि एखादी नवीन जबाबदारी मिळू शकते. या गोचरच्या दरम्यान आत्मविश्वासात वाढ होईल. कुटुंबासोबत चांगले क्षण घालवाल. आईच्या प्रकृतीत पहिल्यापेक्षा सुधारणा होईल. एखाद्या जुन्या नातेवाईकाची भेट होईल.

कन्या

या गोचरच्या दरम्यान अनेक धाडसी निर्णय घ्याल आणि आपल्या लक्ष्याच्या दिशेने मजबुतीने पुढे जाल. हे गोचर व्यक्तिगत आणि व्यावसायिक दोन्ही क्षेत्रात यशाचे कारक ठरेल. मार्केटिंग, सेल्स, आणि पब्लिक डीलिंगच्या क्षेत्राशी संबंधित जातकांनासुद्धा बुधचे हे गोचर लाभ देईल. या गोचरच्या दरम्यान आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा, अन्यथा सहकार्‍यांशी संबंध बिघडतील. एखाद्या छोट्या प्रवासातून लाभ मिळेल. नोकरीत बदलाचा विचार करत असाल तर या काळात चांगली संधी मिळेल.

तूळ

तूळ राशीच्या जातकांसाठी बुधाचे गोचर खूप शुभ परिणाम घेऊन येत आहे. या गोचरच्या दरम्यान भाग्याची खूप साथ मिळेल. तसेच मजबूत धनयोगाची स्थिती होत आहे. परदेशातूनसुद्धा धनलाभ होऊ शकतो. मात्र, या गोचरच्या दरम्यान काही खर्चसुद्धा करावे लागू शकतात. यावेळी खर्च आणि बचत यामध्ये संतुलन ठेवावे लागेल. कुटुंबाच्या सदस्यांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न कराल. एखाद्या दूरच्या प्रवासाची योजनासुद्धा आखू शकता. घाईगडबडीत गुंतवणुकीचा निर्णय घेऊ नका.

वृश्चिक

वृश्चिक राशीला गोचर काळात संमिश्र परिणाम मिळतील. सामाजिकदृष्ट्या संबंध बनवण्यासाठी बुधाचे हे गोचर तुमच्यासाठी खूप चांगले ठरू शकते. यातून तुम्हाला मोठ्या कालावधीसाठी फायदासुद्धा होऊ शकतो. प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न तुम्हाला कार्यक्षेत्रात यश देतील. मात्र, या काळात तुम्ही चिंता आणि तणावात राहू शकता. घाईत कोणताही निर्णय घेऊ नका.टीकेचा स्वीकार करण्यास शिका. कुठूनतरी अचानक लाभ मिळण्याची प्रबळ शक्यता आहे. या दरम्यान आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. योग करणे आणि ध्यान केल्याने मन शांत राहील.

धनू

या गोचर काळात तुमचा विवाह पक्का होऊ शकतो. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी संबंध मजबूत होतील. जे लोक मल्टिनॅशनल कंपनीत काम करत आहेत किंवा परदेशात आपले करिअर करायची इच्छा आहे, त्यांना या गोचर काळात शुभ फळ मिळण्याची प्रबळ शक्यता आहे. व्यापारात चागला लाभ मिळेल. परदेशातून व्यवसायाचे काही प्रस्ताव मिळू शकतात. घोईत कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा नुकसात सोसावे लागेल. खर्चावर लक्ष द्या आणि बजेट बनवून वाटचाल करा. यादरम्यान झोपेशी संबंधित एखादी समस्या होऊ शकते.

मकर

बुधाचे हे गोचर मकर राशीच्या जातकांसाठी शुभ परिणाम घेऊन येईल. मोठ्या बहीण-भावांचे आणि मित्रांचे सहकार्य लाभेल. काम करण्याच्या काही नवीन संधी मिळतील आणि कार्यक्षेत्रातसुद्धा लाभ मिळेल. या गोचर दरम्यान शत्रूंपासून सावध राहा. कारण या काळात ते तुमचे एखादे नुकसान करू शकतात. भाग्याची पूर्ण साथ मिळेल. एखाद्या कायदेशीर प्रकरणात विजय मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराचा सल्ला उपयोगी पडेल. या दरम्यान धाडसाने काम करा, कारण तुमचा समजूतदारपणा आणि परिपक्वता या काळात चांगले परिणाम देईल.

कुंभ

या राशीच्या जातकांना गोचरचे अनुकूल परिणाम मिळतील. कामाच्या ठिकाणी आपला ठसा उमटवाल. जुन्या पद्धती सोडून नव्या पद्धतीने अवलंबाल, ज्यामुळे कामाची ठिकाणी वेगळी ओळख निर्माण होईल. कार्यक्षेत्रात आपल्या कामाशी संबंध ठेवा. पदोन्नती होऊ शकते. जोडीदाराशी असलेल्या नात्यात सुधारणा आणि मधुरता येईल. स्पर्धा किंवा सरकारी परीक्षेची तयारी करत असाल, तर प्रयत्नांना चांगले परिणाम मिळतील.

मीन

बुधाचे हे गोचर मीन राशीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप चांगले परिणाम घेऊन येत आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीच्या शिक्षण संस्थेत प्रवेश घ्यायचा आहे, त्याची इच्छा पूर्ण होईल. जोडीदारासोबत वेळ घालवण्यासाठी काळ चांगला आहे. जर तुमच्या दोघांमध्ये काही वाद सुरू असेल तर या काळात बोलून मार्ग काढता येईल. या गोचर काळात उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. तसेच मालमत्तेत गुंतवणूक करू शकता. ही गुंतवणूक सकारात्मक परिणाम घेऊन येईल.