गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

पिंपरी चिंचवड मुस्लिम विकास परिषद व पिंपरी चिंचवड एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सहा उर्दू माध्यमिक शाळेतील इयत्ता दहावीत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार रविवारी जमाते लतिफिया मस्जिद हॉल, पिंपरी येथे करण्यात आला. यावेळी आयकर उपायुक्त स्वप्निल पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच प्रोफेसर नौशाद शेख, पनवेल महापालिकेचे उपायुक्त जमीर शेख यांनी देखील पुढील करिअर साठी मोलाचे मार्गदर्शन केले. महानगरपालिकेच्या सहा उर्दू माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी या वेळी उस्फूर्त पणे हजेरी लावली होती. पालकांमध्ये खास करुन महिला वर्गाची उपस्थिती मोठी होती.
[amazon_link asins=’B07DZY45TY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2f36df4f-84cc-11e8-a2a9-1bac0c7f43e3′]
आयकर आयुक्त स्वप्निल पाटील यावेळी बोलत असताना त्यानी स्वतः गरीब शेतकऱ्यांचा मुलगा ते आयकर आयुक्त असा प्रवास सांगितला. गरीबी ही तुमची स्वप्ने गाठण्यासाठी कधीच अडचण बनवू नका, स्वप्ने साकार करण्यासाठी अथक परिश्रम घेण्याची गरज असते, असा मोलाचा कानमंत्र त्यानी  दिला.

यावेळी हाजी गुलजार शेख अध्यक्ष जमिअत-ए-उलेमा-ए-हिंद, पिंपरी यांच्या वतीनेही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन संस्थेचे सचिव शफीउल्ला काझी यांनी केले.
संस्थेचे अध्यक्ष अकील मुजावर यानी मान्यवरांचे व जमलेल्या पालकांचे आभार मानले.