#MeToo : उशिरा दाद मागणे म्हणजे न्यायाला मुकणे, कायदेतज्ज्ञांचे मत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

मी टू चळवळीच्या माध्यमातून अनेक वर्षांनंतर उघडकीस आलेली लैंगिक गैरवर्तणुकीची प्रकरणे न्यायालयात तग धरू शकणार नाहीत. कायदा पुरावा मागतो. शिवाय अन्याय झाला हे सिद्ध करण्याची जबाबदारीही संबंधित महिलेवरच येते. त्यामुळे विलंबाने दाद मागणे म्हणजे न्याय मिळण्यापासून वंचित राहण्यासारखेच आहे, असे मत कायदातज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’be3db67e-cf62-11e8-b6b1-a16eecc96972′]

सध्या सुरू असलेल्या मी टू या सोशल मीडियावरील मोहिमेमुळे लैंगिक गैरवर्तणुकीची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. मात्र, ही प्रकरणे अनेक वर्षांपूर्वी घडलेली आहेत. याबाबत अ‍ॅड. क्रांती साठे यांनी म्हटले की, लैंगिक गैरवर्तणुकीच्या प्रकरणांमध्ये न्याय मागण्यास उशीर केलेला आहे. त्यामुळे न्याय मिळण्याची शक्यताही धूसर आहे. गुन्हा घडल्यानंतर तो दाखल करण्यासाठी कायद्याने वेळ मर्यादा घालून दिली आहे. तसेच पुराव्यांच्या आधारेच न्यायालयीन प्रकरणाचा निकाल लागतो. शिवाय अशी प्रकरणे विलंबाने दाखल केली, तर अन्याय झाल्याचे सिद्ध करण्याची जबाबदारी तक्रारदार महिलेवर येते. त्यामुळे महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा उशिराने दाखल करण्यात आला, तरी खटल्याच्या वेळी पोलिसांची भूमिका तीच राहील वा असे खटले टिकू शकतील असे नाही, असे साठे म्हणाल्या.

धक्कादायक…… पुण्यात संतप्त नागरिकांनी सराईत गुन्हेगाराला ठेचले ; गुन्हेगाराचा मृत्यू

तर अ‍ॅड. रोहिणी सालियान यांनी म्हटले की, खटला नैतिकतेवर नाही, तर पुराव्यांवर चालतो. महिलांनी अत्याचारांना लगेच वाचा फोडायला हवी. सहकारी, कंपनी, पोलीस यांनी सहकार्य केले नाही तर त्यांनी न्यायालयात दाद मागावी. अ‍ॅड. अशोक मुंदरगी म्हणाले, विलंबाने दाखल केलेले गुन्हे कसे सिद्ध करणार, पुरावे कुठून आणणार? असे प्रश्न आहेत. दाद मागण्यासाठी एवढा विलंब का हाही स्वतंत्र प्रश्न आहे.

[amazon_link asins=’B00QNIADP0,B01L1IULRG’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c62fb51e-cf62-11e8-91ca-27dbee822cc1′]

दरम्यान, अभिनेता नाना पाटेकर यांच्यासह चार आरोपींना तातडीने अटक करून त्यांची लाय डिटेक्टर, ब्रेन मॅपिंग आणि नार्को अ‍ॅनालिसिस चाचण्या करा, अशी मागणी तनुश्री दत्ता हिने ओशिवरा पोलिसांकडे केली आहे. तनुश्रीच्या आरोपांनुसार पाटेकर यांच्यासह नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य, चित्रपट दिग्दर्शक राकेश सारंग, चित्रपट निर्माते समी सिद्दिकी यांच्याविरोधात ओशिवरा पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदवला आहे. प्रत्येक आरोपी  प्रभावी व्यक्तिमत्त्व आहे. आरोपींचे राजकीय पक्षांशी संबंध आहेत. त्यामुळे ते साक्षीदारांवर दबाव आणू शकतात. तसेच बनावट साक्षीदार उभे करू शकतात. त्यामुळे त्यांना तातडीने अटक करणे आवश्यक आहे, असे तनुश्रीने पोलिसांना दिलेल्या अर्जात म्हटले आहे. गुन्हा नोंदविण्याच्या प्रक्रियेदरम्यान आरोपींनी माध्यमांसमोर आरोप धुडकावून लावले आहेत. पोलीस चौकशीतही ते हीच भूमिका घेतील. त्यामुळे पारदर्शक तपासासाठी आरोपींकडून नेमकी माहिती पोलिसांना मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांच्या नार्को, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर चाचण्या कराव्यात, अशी मागणी तनुश्रीने केली आहे.