Michael Bracewell | ब्रेसवेलने केली धोनीच्या ‘त्या’ विक्रमाशी बरोबरी; अशी कामगिरी करणारा ठरला जगातील दुसरा खेळाडू

पोलीसनामा ऑनलाईन : भारत आणि न्यूझीलंड यांच्या सध्या वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना काल पार पडला. हा सामना भारताने जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारताने 12 धावांनी निसटता विजय मिळवला आहे. एकवेळ हा सामना भारत सहज जिंकेल असे वाटत असताना न्यूझीलंडचा अष्टपैलू क्रिकेटर मायकल ब्रेसवेलने (Michael Bracewell) एकतर्फी झुंझार खेळी करून हा सामना न्यूझीलंडच्या बाजूने झुकवला मात्र त्याला आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले. मायकल ब्रेसवेल (Michael Bracewell) न्यूझीलंडकडून सर्वात वेगवान शतक करणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. तसेच त्याने या शतकाबरोबर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

काय आहे धोनीचा विक्रम?
7 व्या क्रमांकावर फलंदाजी करताना कोणत्याही फलंदाजाने केलेली ही चौथी सर्वोत्तम खेळी ठरली आहे. ब्रेसवेलच्या आधी धोनीच एकमेव असा खेळाडू होता ज्याने वनडे क्रिकेटमध्ये 7 व्या किंवा त्याहून खालच्या क्रमांकावर खेळताना दोन शतके केली आहेत. कालच्या सामन्यात ब्रेसवेलने (Michael Bracewell) भारताविरुद्ध शतक करत धोनीच्या या विक्रमाची बरोबरी केली. ब्रेसवेलने भारताआधी आयर्लंडविरुद्ध 2022 मध्ये 127 धावांची नाबाद खेळी केली होती. तर धोनीने 7 व्या क्रमांकावर खेळताना आफ्रिका आणि पाकिस्तान विरुद्ध शतक झळकावले होते.

कालच्या सामन्यात भारताने शुभमन गिलच्या द्विशतकाच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना 349 धावा केल्या
होत्या. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंडचा निम्मा संघ 110 धावात बाद झाला होता.
यानंतर मायकल ब्रेसवेल आणि सँटनर यांनी झुंझार खेळी करत 7 व्या गड्यासाठी 162 धावांची भागिदारी केली.
एकदिवीस क्रिकेटच्या इतिहासात सातव्या गड्यासाठी ही तिसरी सर्वात मोठी भागिदारी ठरली आहे.
शेवटच्या षटकात भारताच्या शार्दुल ठाकूरने ब्रेसवेलला पायचित करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
मायकल ब्रेसवेलने संघासाठी झुंझार खेळी केली पण त्याला संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले.

Web Title :- Michael Bracewell | michael bracewell equals ms dhoni record 2 century on 7th number

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aurangabad Crime News | मित्रासोबत फोनवर बोलत राष्ट्रीय विधी विद्यापीठातील विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल

Pune Cyber Crime News | गॅस रेग्युलेटर बसत नाही, गुगलवरील कस्टमर केअरचा सल्ला पडला पावणे सहा लाखांना, ज्येष्ठ महिलेला सायबर चोरट्यांनी घातला गंडा

PM Narendra Modi In Mumbai | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाची भिंत तोडल्यामुळे विद्यार्थी आक्रमक; म्हणाले…