Rohit Sharma | टीम इंडियाला जिंकण्यासाठी काय करावे लागणार; रोहितने सांगितला फॉर्म्युला

जयपूर : वृत्तसंस्था –  Rohit Sharma | भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातल्या टी-20 सीरिजला 17 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या सीरिजपासून भारतीय क्रिकेटमध्ये नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे. रोहित शर्माची (Rohit Sharma) टी-20 टीमचा कर्णधार म्हणून तर राहुल द्रविड यांची टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये ( T-20 World Cup) टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक झाली होती. या स्पर्धेत भारतीय टीमला उपांत्य फेरीसुद्धा गाठता आली नव्हती. त्यातच आता पुढचा टी-20 वर्ल्ड कप 11 महिन्यांवर येऊन ठेपला आहे, त्यामुळे रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या जोडीला नवी टीम तयार करावी लागणार आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या सामन्याआधी रोहित शर्माने (Rohit Sharma) भारताच्या विजयाचा फॉर्म्युला सांगितला.
‘भारताची टी-20 आंतरराष्ट्रीयमधली कामगिरी चांगली राहिली आहे, पण आम्हाला आयसीसी (ICC) स्पर्धा जिंकता आली नाही.
यासाठी आम्हाला ब्लू प्रिंट (Blueprint) तयार करावी लागेल’, असे मत रोहितने व्यक्त केले आहे.
2013च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर ( Champions Trophy) भारताला एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आली नाही.
तसेच रोहित शर्माने विराट कोहलीबाबतसुद्धा (Virat Kohli) वक्तव्य केले आहे. ‘विराट कोहली महत्त्वाचा खेळाडू आहे.
तो जेव्हा खेळतो तेव्हा त्याचा खूप प्रभाव असतो. त्याच्या पुनरागमनानंतर टीम आणखी मजबूत होईल,’ असं रोहित म्हणाला.
विराट कोहलीला टी-20 सीरिज आणि पहिल्या टेस्टसाठी आराम देण्यात आला आहे. दुसऱ्या टेस्टपासून तो टीममध्ये पुनरागमन करेल असे रोहित शर्मा म्हणाला.

टी-20 सीरिजमधून अनेक मोठे खेळाडू बाहेर आहेत यावर प्रतिक्रिया देताना रोहित म्हणाला आम्ही मशीन नाही, वर्कलोड मॅनेजमेंट महत्त्वाचं आहे.
याच कारणामुळे वरिष्ठ खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. आम्हाला ताजेतवाने राहायचंय, तसंच पुढच्या सीरिजसाठीही तयारी करायची आहे.
असं रोहितने सांगितलं. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन ( Ken Williamson) भारताविरुद्धची टी-20 सीरिज खेळणार नाही आहे त्याच्याऐवजी टीम साऊदी
( Tim Southee) टीमचे नेतृत्व करणार आहे. हि भारतासाठी जमेची बाजू असणार आहे.
विलियमसनची कमी न्यूझीलंडला जाणवेल, पण त्यांच्याकडे अनेक मॅच जिंकवून देणारे खेळाडू आहेत.
टी-20 वर्ल्ड कपमध्ये त्यांच्या अनेक खेळाडूंनी चांगली कामगिरी केली, आमचं लक्ष सगळ्यांवर आहे, असं वक्तव्य रोहित शर्माने यावेळी केले.

 

Web Title : Rohit Sharma | ind vs nz rohit sharma said team india performance in t20 cricket is good but not won icc trophies

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Reserve Bank Of India | रिझर्व्ह बँकेने 100 पेक्षा जास्त अनावश्यक सर्क्युलर माघारी घेतले

Vir Das | ‘भारतात दिवसा महिलांची पूजा, रात्री त्यांच्यावर बलात्कार’; कॉमेडियन वीर दासच्या कवितेवरून नवा वाद

Anushka Sharma | हिरव्या मोनोकनीमध्ये अनुष्का शर्माने केला फोटो शेअर तर पती विराट कोहलीने केली ‘अशी’ कमेंट