मध्यरात्री वाढदिवस साजरा करणाऱ्यांना हटकल्याने तरुणाला धारदार हत्यारांनी जबर मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – वाढदिवस साजरा करून थांबलेल्या टोळक्याला पुढे जाऊन सांगितल्याच्या कारणावरून चार जणांनी का तरुणावर कोयता, पालघन, व लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केल्याची घटना मंगळवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास एकबोटे कॉलनी परिसरात घडली. याप्रकरणी खडक पोलिसांनी चौघांनाही अटक केली असून जखमी झालेल्या तरुणावर उपचार सुरु आहेत.

मनोज उर्फ पप्पू बन्सी खाडे (२९, अप्पर बिबवेवाडी) या तरुणाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार युवराज सोनवणे, मुशब्बर उर्फ पापा शेख, सौरभ खंदारे, सिकंदर पल्ला अशी अटक कऱण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुशब्बर शेख याचा मंगळवारी वाढदिवस होता. त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी युवराज सोनवणे, सौरभ खंदारे, सिंकदर पल्ला हे एकबोटे कॉलनीतील कल्याणकर पुलावर जमले होते. त्यावेळी त्यांनी रात्री तेथे केक कापला. त्यानंतर त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे मनोज खाडे याने त्यांना पुढे जाऊन थांबण्यास सांगितले. त्यानंतर याचा राग आल्याने चौघांनी खाडे याला कोयता, पालघन व लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केली. त्यानंतर परिसरातील लोक तेथे जमल्यानंतर त्यांनाही धमकावून निघून गेले. यात जखमी झालेल्या खाडे याला रुग्णालयात दाखल कऱण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी चौघांना अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मिसाळ करत आहेत.