पाकिस्तानचं नवीन ‘कारस्थान’, पार्सलमधून BSF च्या मुख्यालयात पाठवलं IED

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – घुसखोरी करण्यामध्ये वारंवार अपयशी ठरलेल्या पाकिस्तानने आता बीएसएफ मुख्यालयात आयईडी युक्त पार्सल पाठवून नुकसान करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु सतर्कतेमुळे ही दुर्घटना टळली आहे. बॉम्ब विरोधी पथकाने रविवारी हे पार्सल ताब्यात घेतले. सुरक्षा प्रणाली याबाबत अधिक तपास करत आहेत आणि आता सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्यात आली आहे.

सीमा सुरक्षा दलाचे 173 वी वाहिनीचे जिल्ह्यातील पंजटीला येथे मुख्यालय आहे. येथे गेटवर कमांडंटच्या नावाचे एक पार्सल देण्यात आले. ते सध्या सुट्टीवर आहेत. जेव्हा हे पार्सल गुरिंदर सिंह यांनी उघडले तेव्हा त्यात आयईडी बसविण्यात आले होते.

अधिकाऱ्याने पूर्ण सावधानीने हे पार्सल उघडले यामुळे कोणताही स्फोट झाला नाही. यामध्ये थोडी देखील चूक झाली असती तर मोठी दुर्घटना झाली असती. याची माहिती तांबडतोब वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. पार्सल देणाऱ्याचा तपास सुरु करण्यात आला आहे. तसेच यासंबंधी ठिकाणचे सीसीटीव्ही देखील तपासले जात आहेत.

मोटारसायकल वरून आला होता पार्सल देणारा
शनिवारी दोन तरुणांनी मोटारसायकल वरून येत हे पार्सल गेटवर सोडले होते. कारण हे कोणाच्या व्यक्तिगत नावावर नाही तर कमांडंट यांच्या नावे केला गेला होता. या पार्सलचे वजन 100 ग्राम इतके होते. त्यामुळे याचा स्फोट झाला असता तर एका व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागले असते.

बीएसएफ अधिकाऱ्याला मारण्याच्या प्रयत्नाला अपयशी करण्यात आले आहे तसेच प्रत्येक प्रकारच्या स्थितीशी निपटण्याची आमची तयारी असल्याची माहिती एन एस जमवाल, आयजी बीएसएफ यांनी दिली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/