अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांचे रोखठोक विधान, म्हणाले – ‘भारतात लाखो बेघर अन् उद्योगपतींचा राजेशाही थाट’

वॉशिंग्टन : पोलीसनामा ऑनलाइन – भारतात एका बाजूला लाखो लोक बेघर आहेत, तर दुस-या बाजूला भारतीय उद्योग क्षेत्रातील रथीमहारथी हे राजेमहाराज आणि मुघलांनाही लाजवतील, अशा थाटात जगत (millions-people-homeless-india-industrialists-life-kings-and-mughals) आहेत, असे रोखठोक विधान अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (Former US President Barack Obama) यांनी आपल्या ‘ए प्रॉमिस्ड लँड (A Promised Land) पुस्तकात करत भारतीय उद्योगपतींवर निशाणा साधला आहे.

बराक ओबामा यांचे ‘ए प्रॉमिस्ड लँड’ नावाचे पुस्तक दोन भागाचे असून, त्याचा एक भाग मंगळवारी (दि. 17) प्रकाशित झाला आहे. या पुस्तकामध्ये ओबामा यांनी आपल्या राजकीय व सामाजिक जीवनातील आठवणी शब्दबद्ध केल्या आहेत. तसेच ओबामा यांनी याच पुस्तकात राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर टीका केली आहे, तर भारताचे माजी पंतप्रधान मनमोहनसिंग (Manmohan Singh) यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. पण त्याचवेळी भारतातील उद्योगपतींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

पीटीआयच्या माहितीनुसार, ओबामांनी या पुस्तकात भारतातील गरिबीवर भाष्य केले आहे. एकीकडे भारतात लाखो लोक आजही अतिशय वाईट अवस्थेत जीवन जगत आहेत. दुष्काळग्रस्त गावांमध्ये लोक झोपड्यांमध्ये काटकसर करत जीवन जगत आहेत, तर दुसरीकडे भारतीय उद्योगपती ऐशाेआरामाचे जीवन जगत आहेत, असे ओबामा यांनी म्हटले आहे. ओबामा यांनी पुस्तकात 2008 सालच्या निवडणूक प्रचारापासून ते पाकिस्तानात अल् कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनचा खात्मा केलेल्या अभियानापर्यंतची सर्व माहिती नमूद केली आहे.

ओबामांना भेटण्यासाठी उद्योगपतींची रांग
बराक ओबामा 2015 साली भारत दौऱ्यावर आले होते. तेव्हा ते अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष होते. यावेळी ओबामा यांना भेटण्यासाठी भारतातील उद्योगपतींची रांग लागली होती. या रांगेत रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचाही समावेश होता. उद्योगपती ओबामांना भेटण्यासाठी रांगेत उभे असल्याचा एक फोटोदेखील त्यावेळी प्रचंड व्हायरल झाला होता.