‘MIM’ आघाडीपासून ‘वंचित’ ! ‘स्वबळा’वर लढण्याची घोषणा

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममधील वाद अखेर चव्हाट्यावर आला आणि खासदार इम्तियाज जलील यांनी घोषणा केली की, आम्ही वंचित बरोबर जाणार नसून, स्वबळावर लढणार आहे. त्यामुळे आता येणाऱ्या विधानसभेच्या तोंडावर वंचित आणि एमआयएम स्वबळावर लढतील.

एमआयएमने विधानसभेला 95 जागांची मागणी केली होती परंतू प्रकाश आंबेडकर यांनी मात्र याला नकार देत एवढ्या जागा देणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर इम्तियाज जलील यांनी सांगितले होते की आम्ही ओवेसींची भेट घेणार आहेत. त्यानंतर निर्णय कळवण्यात येईल.

अखेर आज एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी घोषणा केली की एमआयएम विधानसभेत स्वबळावर लढेल.

दरम्यान, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी जागावाटपावर नाराजी व्यक्त केल्यानंतर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले एमआयएम आणि आमच्यामध्ये कुठलेही मतभेद नाहीत. महाराष्ट्रात विधानसभेच्या सर्व २८८ जागा लढविण्याची वंचितची तयारी असल्याचा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –