सावधान ! …तर 30 नोव्हेंबरनंतर वाहनांसाठी ‘दुप्पट’ टोल, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – या वर्षीच्या १ डिसेंबर पासून सरकारने सर्व राष्ट्रीय महामार्गांवर टोल नाक्यांवर सर्व गाड्यांना फास्टैग च्या आधारे टोल घेतला जाणार आहे. रस्ते आणि परीवहन मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले कि, 1 डिसेंबर पासून टोल नाक्यांवर सर्व गाड्यांना आता फास्टैगच्या आधारे टोल भरावा लागणार आहे. ज्यात्या वाहनाला फास्टैग नसेल तर त्याच्याकडून दुप्पट टोल वसूल केला जाईल. यासाठी मंत्रालयाने राष्ट्रीय राज्यमहामार्ग प्राधिकरणाला पत्र लिहून यासंबंधीचे आदेश पाळण्याच्या सूचना केल्या आहेत. सध्या प्रत्येक टोल नाक्यावर एक हायब्रीड लेन असून फास्टैग शिवाय अन्य सुविधा देखील आहेत. मात्र त्यानंतर सर्व लेन या फास्टैग वाल्या केल्या जातील.

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार अनेक गाड्या फास्टैग नसताना देखल त्या लेनमधून जात असतात. या गाड्या रोख पैसे देऊन टोल भरत असतात. त्यामुळे फास्टैग वाल्या लेनमध्ये देखील गर्दी होते. त्यामुळे या सेवेचा वापर करणाऱ्या नागरिकांना देखील अडचणींचा सामना करावा लागतो. या प्रक्रियेमुळे डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन मिळेल आणि टोल नाक्यांवर होणारी गर्दी देखील कमी होईल. यासाठी सर्व टोल नाक्यांवर पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नवीन वाहनांना कंपन्या लावत आहेत फास्टैग
मागील दिन वर्षांपासून नवीन वाहनांना फास्टैग लावणे अनिवार्य आहे. त्यामुळे कंपन्या पहिल्यापासूनच वाहनांना फास्टैग लावून देत आहेत. जर तुमच्याकडे दोन वर्षांपेक्षा जुनी गाडी आहे तर तुम्हाला गाडीवर फास्टैग लावून घेण्याची गरज आहे.

काय आहे फास्टैग ?
फास्टैग हे एक उपकरण असून रेडियो फ्रीक्वेंसी आइडेंटिफिकेशन या तंत्रज्ञानावर हे काम करते. यामध्ये तुम्ही गाडी टोल नाक्यावरून गेल्यास आपोआप या कोडच्या मदतीने तुमच्या खात्यातील विशिष्ट टोलची रक्कम आपोआप वजा होते.

फास्टैगचे फायदे
यामुळे आता तुम्हाला कोणत्याही टोल नाक्यावर थांबायची गरज नसून या टॅगच्या मदतीने तुम्ही थेट बाहेर पडू शकता. यामुळे तुमचा वेळ वाचणार असून रोखीचे व्यवहार देखील बंद होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे डिजिटल वापरला प्रोत्साहन मिळणार आहे.

1 डिसेंबरपासून अंमलबजावणीचे आदेश
परिवहन विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, या अंमलबजावणीचे कडक आदेश देण्यात आले असून 1 डिसेंबरपासून गाड्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like