दौंड तालुक्यातील रावणगाव येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन
अब्बास शेख

दौंड तालुक्यातील रावणगाव येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची गंभीर घटना घडली असून दौंड पोलिसांनी भाऊसाहेब काशीनाथ आटोळे वय २३ राहणार बंगलावस्ती रावणगाव ता. दौंड या नराधमास अटक केली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3fa142fc-c64b-11e8-8a12-5f3c1b43d8c7′]

दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गजानन जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार सकाळी १०:३० वाजता आरोपी भाऊसाहेब ने आटोळे याने पीडित अल्पवयीन मुलीस रावणगाव येथील सरकारी दवाखाण्याजवळ असणाऱ्या उसाच्या शेतामध्ये हाताला पकडून ओढत नेत तिच्यावर जबरी संभोग केला यावेळी पीडित मुलीने आरोपीच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर आपल्या नातेवाईकांसह पोलीस ठाण्यात जाऊन स्वतः या नराधमाविरुद्ध तक्रार दिली यानंतर दौंड पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी आटोळे यास अटक केली परंतु राज्यात आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुली आणि महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे समोर येत असताना आता दौंड तालुक्यातही महिला आणि अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराचे प्रमाण वाढत चालले असल्याचे काल घडलेल्या या घटनेवरून समोर आले आहे.

[amazon_link asins=’B06XFLY878,B071JWBFDT’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4ecc7880-c64b-11e8-aa5a-6f09ebf9d8cf’]

या अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची घटना रावणगाव येथे समोर आल्याने तालुक्यातील महिला, युवती, विधवा महिला, चिमुकल्या मुलींची सुरक्षितता धोक्यात येत आल्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.

मुली, महिलांवरील अत्याचारासंबंधीचे कायदे कठोर करण्यात आले असले तरी अल्पवयीन मुली आणि महिलांवर घडत असलेल्या गुन्ह्याचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालला आहे. नराधमांकडून महिला व मुलींचा विनयभंग, शारीरिक व मानसिक अत्याचाराच्या घटनांमध्येसुद्धा कमालीची वाढ झाली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेकदा आरोपींवर कठोर कारवाई होत नसल्याने आणि आरोपी उथळ माथ्याने फिरत असल्याने पोलिसांचा वचक वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे. महिलांचे सबलीकरण आणि त्यांच्या सुरक्षेबाबत सरकारी यंत्रणा दावा करत असल्या तरी राज्यातील मुली आणि महिला आजही असुरक्षित असल्याचे या नवनवीन घटनांवरून समोर येत आहे.

त्यामुळे आता कायद्यासोबतच पोलीस यंत्रणेनेही अश्या नराधमांविरोधात कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

[amazon_link asins=’B07BHFT3VQ,B07GLS2TRR’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9dc5baa1-c64e-11e8-a674-9db1a4b60bce’]

पुणे : शिक्षकी पेशाला कलंक लावणारी घटना पुण्यातील येरवडा परिसरात घडली आहे. ट्युशन शिक्षकाने ट्युशनसाठी आलेल्या १३ वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग केला. पिडित विद्यार्थीनीच्या आईने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. हा प्रकार २५ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर दरम्यान सकाळी सहा ते साडेसातच्या सुमारास घडला. पोलिसांनी ट्युशन शिक्षकाला अटक केली आहे. या घृणास्पद प्रकाराबाबत पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

आनंद उर्फ जवान कमलाकर रोनाल्ड (वय-६८ रा. येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ३३ वर्षीय पिडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रोनाल्ड हा परिसरातील मुलांची ट्युशन घेतो. घटनेच्या दिवशी पिडित मुलगी आरोपीच्या घरी ट्युशनला गेली होती. पुस्तक आणण्यासाठी व बॅग ठेवण्यासाठी टेरेसवर गेली. त्यावेळी आरोपी टेरेसवर गेला. त्याठीकाणी त्याने पिडित मुलीसोबत अश्लील बोलून तिच्याशी गैरवर्तन केले. घडलेला प्रकार मुलीने घरी आल्यावर आईला सांगितला. आईने येरवडा पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीविरुद्ध फिर्य़ाद दाखल केली. पिडीतेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी रोनाल्ड याच्याविरुध्द विनयभंगाचा तसेच बाल लैंगिक अत्याचार अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास येरवडा पोलीस करित आहेत.

जाहिरात