भाजप खासदार सनी देओल ‘बेपत्ता’; पठाणकोटमध्ये कॉंग्रेसकडून ‘गुमशुदा की तलाश’ अशी पोस्टरबाजी

अमृतसर : वृत्तसंस्था – अभिनेते आणि भाजप खासदार सनी देओल बेपत्ता असल्याचे पोस्टर पठाणकोटमध्ये (Pathankot) ठिकठिकाणी चिकटवण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीत गुरुदासपूर मतदारसंघातून निवडून आलेले सनी देओल कोरोनाकाळात एकदाही मतदारसंघात फिरकले नाहीत. त्यामुळे युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस वरूण कोहली यांच्या नेतृत्वात पठाणकोटमधील (Pathankot) बस स्टँड आणि रेल्वेस्थानक परिसरात ठिकठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत. तसेच गुमशुदा की तलाश अशी उपहासात्मक टीकाही केली आहे. तसेच सनी देओल यांच्याविरुद्ध घोषणाबाजीही केली आहे.

Maharashtra Unlock : राज्यात 5 टप्प्यात होणार अनलॉक, मात्र पुण्यात लॉकडाऊन; जाणून घ्या कारण ?

अवघा देश कोरोना संकटाचा सामना करत आहे. कोरोनाचा फटका सनी देओल यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या गुरुदासपूर अन् पठाणकोट यांनाही बसला आहे. मात्र, येथील खासदारांना काहीही देणंघेणे नाही. खासदार सनी देओल मुंबईत व्यस्त आहेत. कोरोना संकटकाळात लोकांत राहणे गरजेचे असतानाही सनी देओल मुंबईत असल्याची टीका युवक काँग्रेसने केली आहे. दरम्यान पठाणकोट येथील सनी देओलच्या कार्यालयाचे प्रभारी पंकज जोशी यांनी खासदारांची बाजू मांडली आहे. कोरोना काळात सनी देओल यांनी लाखो मास्क, सॅनिटायजर आणि पीपीई कीट मतदारसंघासाठी दिले आहेत. तसेच, पठाणकोट, गुरदासपुर आणि बटाला येथील नागरिकांसाठी 3 आधुनिक सोयी-सुविधांनीयुक्त रुग्णवाहिका पाठविल्या असल्याचे जोशी यांनी सांगितले.

READ ALSO THIS :

Covid-19 Vaccine : कोविड व्हॅक्सीन घेतल्यानंतर ‘ही’ 7 कामं अजिबात करू नका, ‘या’ गोष्टींची घ्या काळजी; जाणून घ्या

मुंबईत प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, किचनमध्ये पुरलेल्या मृतदेहाचे रहस्य 6 वर्षाच्या मुलीने सांगितले

Photos : 133 किलो होते वजन, आयपीएस अधिकाऱ्यानं 9 महिन्यात कमी केलं 43 किलो वजन, वायरल झाली छायाचित्रे