मिशन बिगीन अगेन : पुण्यातील ‘कंटेन्मेंट झोन’ बाहेरील मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्स 5 ऑगस्टपासून सुरू होणार, जाणून घ्या नियमावली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर पुण्यात 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान लॉकडाऊन असणार आहेत. मात्र, प्रशासनानं त्यामध्ये काही सूट दिली असून मिशन बिगीन अगेन सुरू केलं आहे. पुण्यात काही नियम आणि अटीवंर 5 ऑगस्ट पासून प्रतिबंधति क्षेत्राबाहेरील मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्स सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान उघडी राहणार आहेत. त्यामुळे काही महिन्यांपासून बंद असलेले मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्स पुन्हा एकदा काही अटी व नियमांवर सुरू होणार आहेत.

प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील ठिकाणी खालील आस्थापना सुरू राहतील.

1. सर्व अत्यावश्यक वस्तूंची दुकाने / सेवा जसे औषधी विक्री दुकाने, दवाखाने त्यांच्या वेळत दररोज सुरू राहतील तर अन्य अत्यावश्यक वस्तूंची दुकाने / सेवा सकाळी 9 ते सायंकाळी 8 या वेळेत खुली राहतील.

2. सर्व बिगर अत्यावश्यक वस्तूंची दुकाने या पुर्वीच्या आदेशात नमूद केल्याप्रमाणे पी-1 आणि पी-2 पध्दती प्रमाणे सकाळी 9 ते सायंकाळी 7 यावेळेत खुली राहतील. मद्यविक्रीची दुकानाास यापुर्वी संबंधितांना परवानगी मिळाली असल्यास ते घरपोच सेवा किंवा नेहमीच्या पध्दतीप्रमाणे सुरू राहू शकतील.

3. पुणे शहरातील मनपाच्या मंडई मधील सम क्रमांकाचे गाळे सम दिनांकास तर विषम क्रमांकाचे गाळे विषम दिनांकास उघडी राहतील.

4. मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्स दि. 5 ऑगस्ट पासून सकाळी 9 ते सायंकाळी 7 यावेळेत उघडी राहतील. मात्र, यामधील सिनेमागृहे, उपहारगृहे येथे नागरिकांना त्याच ठिकाणावरून यामधील खाद्यपदार्थांचा लाभ देता येणार नाही. तथापि, या ठिकाणाहून खाद्यपदार्थांची घरपोच सेवा करण्यास परवानगी राहील.

5. ई-कॉर्मर्स : ई-कॉमर्सच्या माध्यमातून अत्यावश्यक / बिगर अत्यावश्यक वस्तूचे घरपोच वितरण करता येईल. तसेच कुरिअर सेवा सुरू राहतील.