MLA Aaditya Thackeray | मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आदित्य ठाकरेंचे सूचक विधान, म्हणाले – ‘आता सरकार पडेल पण…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Group) नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (MLA Aaditya Thackeray) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) हल्लाबोल केला आहे. आता शिंदे-फडणवीस सरकार पडेल पण मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) होणार नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची ताकद आणि धमक या सरकारमध्ये नाही, अशा शब्दात आदित्य ठाकरे (MLA Aaditya Thackeray) यांनी शिंदे-फडणवीस सरकरवर टीकास्त्र सोडलं. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

 

आदित्य ठाकरे (MLA Aaditya Thackeray) म्हणाले, आता सरकार पडेल पण मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही. यांना सतत दिल्लीत जावं लागतं. मात्र विस्तार काही होणार नाही. हे लिहून घ्या. 40 लोकांमधून जे मंत्रिमंडळाबाबत आशा लावून बसले आहेत, त्यांना काहीही मिळणार नाही. मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, करण विस्तार करण्याची ताकद आणि धमक यांच्यात नाही.

 

मोठ्या प्रमाणात घोटाळे सरु आहेत

1 जुलैला मुंबईत महामोर्चा (Shiv Sena (UBT) Maha Morcha) काढणार आहोत. गेल्या एक वर्षापासून मुंबईत प्रशासक आहेत. येथे कोणत्याही पक्षाचा किंवा जनतेचा प्रतिनिधी नाहीये. ना नगरसेवक, ना महापौर, ना कुठल्याही समितीचे अध्यक्ष, हे कुणी नसताना तिथे मोठ्या प्रमाणात घोटाळे सुरु आहेत. यामुळे 1 जुलै रोजी दुपारी चार वाजता हा मोर्चा काढला जाणार आहे. सर्व मुंबईकर या मोर्चात सहभागी होणार आहेत. मुंबईचे हाल होतायत, असं ज्यांना वटतं ते सर्वजण मोर्चात सहभागी होणार आहेत, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

 

 

Web Title :  MLA Aaditya Thackeray | aaditya-thackeray-on-cabinet-expansion-shinde-fadnavis-govt-will-collapse


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा