MLA Bacchu Kadu | बच्चू कडूंना हवंय ‘हे’ मंत्रीपद, म्हणाले – ‘शिंदे-फडणवीस फेव्हिकॉलपेक्षा मजबूत जोड’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुरूवातीपासून शिंदे गटात (Eknath Shinde Group) असलेले प्रहार संघटनेचे (Prahar Sanghatana) आमदार बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) यांनी राज्यात स्थापन झालेल्या शिंदे-भाजपा सरकारचे (Shinde-BJP Government) कौतूक केले आहे. आगामी काळात हे सरकार चांगली कामे करेल, असे कडू (MLA Bacchu Kadu) यांनी सांगितले. तसेच शिंदे गटात का सामील झाले, कोणते मंत्रिपद मिळावी अशी अपेक्षा आहे, हे देखील त्यांनी स्पष्ट केले. ते एका वृत्तवाहिनीसोबत बोलत होते.

 

बच्चू कडू (MLA Bacchu Kadu ) यांनी महाविकास आघाडीतून (Mahavikas Aghadi) बाहेर पडण्याचे कारण सांगितले. ते म्हणाले, राष्ट्रवादीकडून (NCP) मतदार संघासाठी निधी मिळत नव्हता. शेवटी जनतेची काम करत असताना तुम्ही मंत्री असलात तरी तुमचा मतदार संघच तुमच्यासाठी महत्वाचा असतो. मी एकनाथ शिंदे यांच्याच माध्यमातून ठाकरे सरकारला (Thackeray Government) पाठिंबा दिला होता.

 

बच्चू कडूंनी नवीन सरकारचे कौतूक करताना म्हटले की, शिंदे आणि फडणवीस फेव्हिकॉलपेक्षा मजबूत जोड आहे. सरकार कोसळणार असे सांगणे हे विरोधकांचे कामच असते. त्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही.

 

कडू पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदेंना कोण काय म्हणतात याकडे लक्ष देण्यासारखे काहीच नाही.
कारण त्यांना रिक्षावाला वगैरे म्हणणे हे त्यांना देखील वाईट वाटणारे नाही. शिंदे किंतू परंतू न ठेवता प्रेम करणारा माणूस आहे.
आम्ही सुद्धा शेतकरी, दूध वाटणारे आहोत. आता दूध वाटणारा म्हणण्यात वाईट काय आहे ? कोणतेही काम वाईट नसते.
तुम्ही सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधित्व करत असता आणि हे सरकार सर्वसामान्य जनतेचे आहे, असे जनतेला वाटणे हेच जास्त महत्वाचे आहे.

 

मंत्रिपदाबाबत काय म्हणाले ?

मंत्रिपदाबाबत विचारले असता बच्चू कडू म्हणाले, मंत्रिपदापेक्षा मतदार संघातील विकास महत्वाचा असतो.
माझ्यासाठी दिव्यांगांचा विषय महत्वाचा आहे. कुणाला कोणते मंत्रिपद मिळणार याकडे लक्ष देत नाही.
दिव्यांगांसाठी वेगळा विभाग बनवून त्याचा चार्ज जर माझ्याकडे दिला तर नक्कीच त्यासाठी चांगले काम करता येईल.

 

Web Title :- MLA Bacchu Kadu | cm eknath shinde and devendra fadnavis connection is very strong says bacchu kadu

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा