MLA Bachchu Kadu | आमदार बच्चू कडूंना मंत्रिपदाचा दर्जा, मुख्यमंत्र्यांचे मानले आभार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जनशक्ती प्रहार पक्षाचे (Jan Shakti Prahar Party) संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) यांना मंत्रिपदाचा दर्जा (Ministerial Status) देण्यात आला आहे. त्यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या (Disability Welfare Department) अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. आमदार बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे आभार मानले आहेत.

 

आमदार बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) यांना कॅबिनेट मंत्री (Cabinet Minister) पदाचा दर्जा जाहिर करण्यात आला असून याबाबतचे परिपत्रक शासनाकडून काढण्यात आले आहे. बच्चू कडू दिव्यांगांसाठी गेल्या वीस वर्षांपासून लढा देत आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेत दिव्यांग कल्याण विभागाच्या अभियानासाठी त्याची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर बच्चू कडूंनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

 

बच्चू कडू म्हणाले, मोठ्या संघर्षानंतर आता देशातील पहिलं दिव्यांग मंत्रालय (Ministry of Disability) सुरु झाले आहे. पण, ते दिव्यांग बांधवांपर्यंत गेलं पाहिजे. ही संकल्पना आमचीच होती. त्या बांधवांची मागणी काय आहे, त्यांच्या समस्या काय आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, आता हे मंत्रालय आम्ही प्रत्येक जिल्ह्यात घेऊन जाणार आहोत. फक्त सेवेसाठी हे अभियान असणार आहे.
राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आम्ही काम करणार आहोत, मला ही संधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिली.
यासाठी मी त्यांचा आभार मानतो, असेही बच्चू कडू म्हणाले.

 

दरम्यान राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) सत्तेत आल्यापासून
आमदार बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा होती.
काही दिवसांपूर्वी त्यांनी याबाबत माध्यमांसमोर बोलून दाखवले होते. अखेर त्यांना मंत्रिपद देण्यात आलं आहे.

 

 

 

Web Title :  MLA Bachchu Kadu | mla bacchu kadu ministerial status cabinet expansion

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा