MLA Chetan Tupe | हडपसर परिसरात नागरी वस्तीत बिबट्या; वन अधिकार्‍यांसह आमदार तुपेंनी केली परिसराची पाहणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हडपसर मधील साडेसतरानळी येथे गेले तीन दिवस बिबट्याचा वावर आहे येथील स्थानिक शेतकऱ्यांनी व रहिवाशांनी याबाबत या भागाचे आमदार म्हणून चेतन विठ्ठल तुपे (MLA Chetan Tupe) यांना ही बाब कळवली व तेथील बिबट्याच्या वावराचे अस्तित्व जाणवून देणारे पायाच्या ठशांचे फोटो पाठवले हे फोटो आमदार चेतन तुपे (MLA Chetan Tupe) यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठवून दिले व याबाबत त्यांची मदत मागण्यात आली

आज आमदार चेतन तुपे वनविभागाचे अधिकारी व स्थानिक नागरिक व शेतकरी यांच्यासमवेत बिबट्या चा वावर असलेल्या परिसराची पाहणी करण्यात आली त्यावेळी या भागातील शेतकऱ्यांनी काही दिवसात या भागातील कुत्री कमी झाल्याचे सांगितले व एका प्रत्यक्षदर्शीने बिबट्या रात्री कुत्र्यांची शिकार करून त्यांना झाडीमध्ये ओढून नेत असल्याचे पण सांगितले त्यानंतर काही वेळानंतर लगेच या परिसरात फिरणाऱ्या बिबट्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आमदार चेतन विठ्ठल तुपे यांनी वनविभागाकडे या नागरी वस्तीत आलेल्या बिबट्याच्या बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे त्याच बरोबर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन देखील केले आहे शेतात काम करत असताना शक्यतो खाली बसून काम करू नये व आपल्या जवळील मोबाईल मध्ये मोठ्याने गाणी लावावीत जेणेकरून आवाजामुळे बिबट्या त्या भागात फिरकणार नाही अशाही सूचना वनविभागाने केलेले आहेत

हे देखील वाचा

Pimpri Crime | पिंपरी चिंचवड पोलिसांकडून दोन टोळ्यांवर ‘मोक्का’ कारवाई

Pune Corporation | पुणे महापालिकेत पुन्हा भाजप आणि RPI ची सत्ता येणार; रामदास आठवलेंचा विश्वास

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  MLA Chetan Tupe | Leopards in urban areas in Hadapsar area; MLA Tupe inspected the area along with forest officials

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update