MLA Disqualification Hearing | आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय ३१ डिसेंबरला होणार का? राहुल नार्वेकर म्हणाले…

मुंबई : अधिवेशन काळात आमदार अपात्रतेच्या (MLA Disqualification Hearing) याचिकेवर सुनावण्या घेऊन लवकरात लवकर निर्णय घेणार आहे. याप्रकरणी सातत्याने मॅरेथॉन सुनावणी घेतली. आताही संविधान प्रणित तरतुदींनुसार कार्यवाही होईल. आमदार अपात्रतेसंदर्भातील निर्णय (MLA Disqualification Hearing) घेण्याचा प्रयत्न आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ३१ डिसेंबरर्यंत निर्णय घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माझाही हाच प्रयत्न आहे, अशी सूचक प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar) यांनी दिली आहे.

उद्यापासून महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर (Maharashtra Legislature Winter Session Nagpur)
येथे होत असून आरक्षण, शेती आणि शेतकऱ्यांचे नुकसान, कायदा-सुव्यवस्था अशा विविध प्रश्नावर अधिवेशन
गाजणार आहे. दुसरीकडे अध्यक्षांना आमदार अपात्रताप्रकरणी सुनावणी घेऊन ३१ डिसेंबरपर्यंत निकाल द्यायचा आहे.
याबाबत राहुल नार्वेकर यांनी वरील प्रतिक्रिया दिली. (MLA Disqualification Hearing)

राहुल नार्वेकर म्हणाले, सभागृहाचे कामकाज किंवा देश-राज्यात शासन चालवण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या
संविधानावरच चालते. महाराष्ट्रातील जनतेला आश्वासित करू इच्छितो की, संविधानाने दिलेल्या नियम
आणि तरतुदींनुसारच हिवाळी अधिवेशनाचे कामकाज चालेल. संविधानाच्या तरतुदी आणि नियमांची कुठेही पायमल्ली
होणार नाही. नियमांनुसार सभागृह चालवले जाईल. सर्व आमदारही संविधानाची शपथ घेऊन सभागृहात काम करत असतात.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

12 BJP MP Resign | भाजपाच्या १२ खासदारांचे राजीनामे; मोदींसमवेत दिल्लीत महत्वाची बैठक, लोकसभेच्या हालचाली वाढल्या

Pune ACB – FIR On Tukaram Supe | टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणातील आरोपी व तत्कालीन शिक्षणाधिकारी तुकाराम सुपेवर पुणे अ‍ॅन्टी करप्शनकडून गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण