‘कोरोना’वर मात करून परतल्याने आमदार दुरानी यांचे पाथरीत स्वागत !

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन- आमदार दुर्रानी यांना कोरोनाची बाधा झाल्याने ते औरंगाबाद येथे उपचारासाठी गेले होते. आमदार दुर्रानी यांनी त्यांच्या फेसबुक माध्यमातून कोरोना संसर्ग बाधा झाल्याची माहिती दिली होती. औरंगाबाद येथे उपचारार्थ गेलेले आमदार दुर्रानी यांनी कोरोना वर मात केली. ते औरंगाबाद येथे काही काळ थांबले. जुलै महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात त्यांना कोरोना ची बाधा झाली होती.

30 ऑगस्ट रोजी ते पाथरीत परतले. पाथरी येथे आमदार दुरानी यांचे आगमन होताच पुष्पवृष्टी करून कार्यकर्त्यांनी फटाके फोडून त्यांचे स्वागत केले. सेंट्रल नाका येथे गाडीतून उतरून दुरानी यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला पुढे ते आपल्या निवासस्थानी निघून गेले. आमदार दुरानी यांच्या स्वागतासाठी सेंट्रल नाका येथे हे बाजार समितीचे सभापती अनिल नखाते, माजी जिप सदस्य चक्रधर उगले, गंगाधर सावकार, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय मायंदळे, सरपंच श्याम धर्मे पाटील, गुलाम मुस्तफा अन्सारी, अमोल भाले पाटील, नितेश भोरे, न.प. सदस्य शाकीर सिद्दिकी, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कोरोनावर मात करून पाथरी ला परतल्याने अनेक कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणि झाला.