MLA Ganpat Gaikwad | पोलीस ठाण्यात गोळीबार करणाऱ्या भाजप आमदाराची पत्नी राजकारणात सक्रिय

ठाणे : MLA Ganpat Gaikwad | उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी तळोजा कारागृहात असलेले भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या सौभाग्यवती सुलभा गायकवाड राजकारणात सक्रिय झाल्या असून भूमिपूजनासह इतर सार्वजनिक उपक्रमातून दिसून येत आहेत. इतर आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात आमदार गायकवाड यांच्या निधीतून मंजूर विविध विकासकामांचे भूमिपूजन आता यांच्या पत्नी सुलभा गायकवाड याच्या हस्ते करण्यात येत आहे. त्यांचा मुलगा वैभव गायकवाड फरार आहे.

सुलभा गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या चिंचपाडा परिसरातील
जनसंपर्क कार्यालया बाहेर विकास कामाचे भूमीपूजन केले. शक्ती प्रदर्शनही केले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. सुलभा गायकवाड यांच्यावर जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करण्यात आली. फटाके वाजवून स्वागत करण्यात आले.

महिन्यभरापूर्वी शिंदे गट शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर आमदार गणपत गायकवाड यांनी
उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यातच गोळीबार केला होता. या घटनेत गंभीर जखमी झालेले महेश गायकवाड
आणि त्यांच्या सहकाऱ्यावर ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amravati-Nagpur National Highway | धावत्या ट्रॅव्हल बसवर सिनेस्टाईल गोळीबार, ४ प्रवाशी जखमी, महाराष्ट्रातील महामार्गांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

Uddhav Thackeray On Eknath Shinde | पक्ष फोडणे ही तुमचा नालायकपणा सिद्ध करणारी वृत्ती…, वायकरांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर ठाकरेंचा हल्लाबोल!

Prakash Ambedkar On Mahavikas Aghadi | तुम्ही आपआपले उमेदवार जाहीर करताय, हे तुम्हाला मान्य आहे का? वंचितने व्यक्त केली जाहीर नाराजी

छोटा शेख सल्ला दर्गा: ‘रील’ व्हायरल करुन अफवा पसरवणाऱ्या दोघांवर वानवडी पोलिसांकडून FIR

Pune Kothrud Crime | किरकोळ कारणावरून तरुणावर सत्तुरने वार, कोथरुड परिसरातील घटना

Computer Engineer Arrested In Pune | पुणे : दुकानातून लॅपटॉप चोरणाऱ्या कॉम्प्युटर इंजिनियरला सायबर पोलिसांकडून अटक