उत्तराखंडच्या ‘बंदूकबाज’ आमदाराची भाजपमधून हकालपट्टी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तराखंडमधील भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रणव चॅम्पियन यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.मागील काही दिवसांपूर्वी या आमदारांचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती. दारूच्या नशेत धुंद असणाऱ्या या आमदारांनी हातात बंदूक घेत नृत्य करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर हि कारवाई करण्यात आली आहे. केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्यावर हि कारवाई केली आहे.

या व्हिडिओमध्ये हे आमदार दारूच्या नशेत एक दोन नव्हे तर चार चार बंदुका घेउन डिस्को डान्स करताना आढळून आले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपने या कृत्याचा निषेध केला होता. भाजपचे प्रचार प्रमुख अनिल बलूनी यांनी म्हटले कि, याआधी देखील त्यांच्यावर कारवाई करण्यात अली होती. आता देखील त्यांना तीन महिन्यांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. त्याचबरोबर त्यांनी या व्हिडिओचा देखील निषेध केला आहे. त्याचबरोबर या आमदाराने या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना म्हटले होते कि, दारूच्या नशेत कधीतरी असं कृत्य होते. मात्र शिवीगाळ प्रकरणी त्यांनी माफी मागितली आहे.

दरम्यान, बंदूक बाळगण्याच्या आणि डान्स करण्याच्या आपल्या कृत्याच्या समर्थन केले आहे. त्यामुळे डान्स करणे हा काही मोठा गुन्हा नाही असे त्यांनी म्हटले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like