MLA Praniti Shinde & Raju Patil On Government House | ‘या’ दोन आमदारांनी सरकारी घरे नाकारली’; सर्वसामान्य जनतेकडून होतंय कौतुक!

MLA Praniti Shinde & Raju Patil On Government House | congress mla praniti shinde and mns mla raju patil on government house
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MLA Praniti Shinde & Raju Patil On Government House | राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session) चालू असून यामध्ये अनेक राजकीय स्फोट होताना दिसत आहेत. अशातच गुरूवारी विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आमदारांसाठी 300 घरे बांधून देणार असल्याची घोषणा केली आहे. या घोषणेचं काही आमदांरानी स्वागत केलं आहे मात्र काहींनी या घरांना विरोध केला आहे. यामध्ये काँग्रेसच्या (Congress) आमदार प्रणिती शिंदे आणि मनसेचे (MNS) आमदार राजू पाटील (MLA Praniti Shinde & Raju Patil On Government House) यांनी याला विरोध दर्शवला आहे. राजू पाटील आणि प्रणिती शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे त्यांचं कौतुक होत आहे.

 

आमदारांना मोफत घरे कशासाठी?, घोषणा तुम्ही करता पण जनता आमदारांना लाखोली वाहत आहे. त्यापेक्षा सर्वसामान्यांना 200 युनिट मोफत वीज द्या आणि जनतेचे आशीर्वाद मिळवा, असं म्हणत राजू पाटील यांनी सरकारने दिलेलं घरं नाकारलं आहे. याबाबत राजू पाटील (Raju Patil) यांनी ट्विट केलं आहे.

 

माझं मुंबईत घर आहे, त्यामुळे मला हे सरकारी घर नको. विनाकारण सरकारी मालमत्ता अडवून ठेवण्यात अर्थ नाही. माझ्यासारख्याच काही आमदारांचं मुंबईत घर त्या आमदारांना घर नको आहे. त्याचे जे पैसे आहेत तर ग्रामीण भागातून मुंबईत उपचारांसाठी येणाऱ्या सर्व सामान्य लोकांसाठी वापरावेत, असं प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी म्हटलं आहे.

आमदारांना घरं मोफत बांधून मिळणार?
मुख्यमंत्र्यांनी 300 घरं बांधून देणार असल्याची जरी घोषणा केली असली
तरी ही घरे मोफत मिळणार नसल्याचं स्पष्टीकरण गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिलं आहे.
आमदारांना देण्यात येणाऱ्या घरांवरून बराच गदारोळ होतोय.
मी स्पष्ट करू इच्छितो की, सदर घरे मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत+बांधकाम खर्च (अपेक्षित खर्च 70 लाख)
याची किंमत संबंधित आमदारांकडून आकारण्यात येणार असल्याचं जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सांगितलं आहे.

 

Web Title :-  congress mla praniti shinde and mns mla raju patil on government house

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Multibagger Returns | टाटा ग्रुपच्या ‘या’ कंपनीने 11 दिवसातच गुंतवणुकदारांना केले मालामाल, एका वर्षात दिला 978 टक्के रिटर्न

 

Pune Corporation | ‘स्मार्ट पुण्यात’ 5 वर्षात फक्त 520 मीटरचा रस्ता विकसित ! अस्तित्वातील रस्त्यांच्या पुर्ननिर्माणावरच सत्ताधारी भाजपचा भर

 

Pune Corporation | पुणे महापालिकेने थकबाकीदारांचे तब्बल 27 गाळे केले सील; आंबेगाव येथील पुरंदर टेक्नीकल एज्युकेशनचे मैदानही घेतले ताब्यात

Total
0
Shares
Related Posts
Satish Wagh Murder Case

Satish Wagh Murder Case | पुणे : आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या पूर्वीच्या भाडेकरुने पाच महिन्यापूर्वी दिली होती सुपारी; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती आली समोर