‘आजारी’ आमदार, ‘कामगिरी’ मात्र ‘दमदार’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) – दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार राहुल कुल यांचा फोन लागण्याचा अचानक बंद झाला. नेमका काय प्रकार आहे हे गावपातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांपासून ते तालुकास्तरावर काम करणारे कार्यकर्ते आणि नागरिकांनाही समजेना. त्यामुळे साहजिकच कार्यकर्त्यांमध्ये एकच चिंतेचे वातावरण निर्माण झाले. गेल्या चार-पाच दिवसांपासून विद्यमान आमदारांचा फोन येईना की जाईना त्यामुळे त्यांच्या फादरबॉडीतील कार्यकर्त्यांनाही काळजी लागून राहिली आणि अखेर त्यांच्या बंद फोन मागील कटू सत्य समोर आले.

Rahul-kul

त्यांनी पावसामध्ये तालुक्यातील अनेक दौरे करत विकास कामांचे उदघाटन आणि भूमिपूजने केली याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर होऊन त्यांना ताप, थंडी आणि सर्दी सारख्या आजाराने बेजार केले. कारण लोकसभा निवडणूकीची धावपळ संपल्यानंतर लगेचच आमदार राहुल कुल यांनी पुन्हा जोमाने तालुक्यातील विकास कामांना सुरुवात केली. त्यांनी आणलेल्या करोडो रुपयांच्या विकास निधींच्या विकासकामांची उदघाटने आणि भूमिपूजने त्यांनी सुरू केली. अगोदर जवळपास १२०० कोटी निधी आणण्यासाठी आणि नंतर मंजूर झालेल्या निधींच्या उदघाटन, भूमिपूजन कार्यक्रमांसाठी झालेली धावपळ या फेऱ्यामध्ये त्यांचे सकाळी सात ते मध्यरात्री दिड वाजेपर्यंत जागरण होत गेले आणि याचा ताण त्यांच्या प्रकृतीवर होऊन त्यांना डॉक्टरांनी सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला.

Rahul-Kul

नाईलाजास्तव डॉक्टरांचा सल्ला आणि जवळील कार्यकर्त्यांची विनंती मानून त्यांना बिछाना धरावा लागला होता. आजार मोठा नसला तरी काळजी घेण्यासारखी परिस्थिती मात्र नक्कीच होती. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलेली पंधरा दिवसांची विश्रांती धुडकावून त्यांनी तीन-चार दिवस विश्रांती घेऊन अखेर रविवार २८ जुलै रोजी पुन्हा कामास सुरुवात केली. त्यांची कामाप्रति जिद्द आणि चिकाटी पाहून अनेक नागरिकांच्या तोंडून “आजारी आमदार, कामगिरी मात्र दमदार” असे गौरोवोद्गार बाहेर पडले. तर याबाबत खुद्द आमदार राहुल कुल यांनी आपल्या प्रकृती अस्वास्थामुळे वेळ देता आला नसल्याने दिलगिरी व्यक्त करून पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली.

आरोग्यविषयक वृत्त –