MLA Ravi Rana | मी त्यांना योग्य वेळ आल्यावर…, आमदार रवी राणांचा बच्चू कडूंना इशारा

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन – भाजप (BJP) समर्थक आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी अपक्ष आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्यावर मोठा आरोप केला होता. गुवाहाटीला जाऊन पैसे घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर केला होता. त्यामुळे राणांच्या विरोधात कडूंनी पोलिसांत तक्रार दिली होती. त्यावर रवी राणांनी (MLA Ravi Rana) प्रतिक्रिया दिली आहे.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आमचे आहेत. त्यामुळे मला त्याचें आदेश सर्वश्री आहेत. त्यांच्या आदेशांचे मी पालन करणार आहे. त्यामुळे कोणाला जर का असे वाटत असेल, की ते बोलतात ते सत्य आहे. कोणावरही शिवीगाळ करणे, खालच्या स्तरावरची भाषा वापरणे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे. सर्वसामान्य जनतेला न्याय देणे, गोरगरिबांची सेवा करणे, महिलांचा आणि युवकांचा सन्मान करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यामुळे स्वत:ला सत्यावादी माननाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, की लोक पाहत आहेत. माझ्यावर कितीही गुन्हे दाखल केले तरी येणाऱ्या काळात यांना लोक धडा शिकवतील, असे राणा (MLA Ravi Rana) म्हणाले.

 

तसेच माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. मी त्यांना घाबरत नाही. मी सामोरा जाण्यासाठी तयार आहे. तसेच माझ्यावर खोटे गुन्हे (FIR) दाखल करणाऱ्यांना मी सोडणार नाही. मी त्यांना योग्य वेळ आल्यावर धडा शिकविणार आहे, असे देखील राणा म्हणाले.

आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू हे दोघेही अमरावतीचे आमदार आहेत.
विशेष बाब म्हणजे हे दोघेही सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे समर्थक आहेत.
त्यांच्यातील बच्चू कडू हे शिंदे यांच्या बंडाच्या काळात त्यांच्यासोबत सूरत, गुवाहाटी आणि गोवा असे दौरे देखील करुन आले.
परंतु मागील काही दिवसांत दोघेही एकमेकांवर शब्दांचे बाण सोडत आहेत.
एकेरी भाषेत एकमेकांचा उल्लेख करणे आणि आरोप करणे हा दोघांसाठी नित्याचा दिनक्रम झाला आहे.

 

Web Title :- MLA Ravi Rana | first reaction of ravi rana after bacchu kadu filed complaint against him

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा