MLA Ravindra Dhangekar | हातात स्टेथोस्कोप, अंगावर ॲप्रॉन, आमदार धंगेकर डॉक्टरांच्या वेशभूषेत पोहचले विधानभवनात

MLA Ravindra Dhangekar | congress mla ravindra dhangekar arrived in vidhan bhavan doctor dresse stethoscope in hand apron on body maharashtra assembly winter session 2023

ललित पाटील प्रकरणी मंत्र्यांवर कारवाईची केली मागणी

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – MLA Ravindra Dhangekar | गुरुवार पासून हिवाळी अधिवेशनाला (Winter Session) सुरूवात झाली आहे. पुण्यातील काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) हे हातात स्टेथोस्कोप, अंगात ॲप्रॉन घालून डॉक्टरांच्या वेशभूषेत (Doctor’s Uniform) विधानभवनात पोहोचले. ललित पाटील प्रकरणात (Lalit Patil Drug Case) सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यासाठी त्यांनी डॉक्टरांच्या वेशभूषेत विधानभवनात येऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

यावेळी बोलताना रविंद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) म्हणाले, ललित पाटील याला पंचतारांकित सेवा दिली होती, डॉ. संजीव ठाकूर (DR. Sanjeev Thakur) यांना अटक (Arrest) करावी यासाठी रस्त्यावर आम्ही उतरलो असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय संजीव ठाकूर यांना ज्यांनी-ज्यांनी फोन केले, कोण कोण यामध्ये होते त्या सगळ्यांची चौकशी व्हावी या मागणीचं लक्ष वेधण्यासाठी मी अधिवेशनात अशाप्रकारे आलो असल्याचे धंगेकर यांनी सांगितले.

मंत्र्यावर कारवाई झालीच पाहिजे

रविंद्र धंगेकर पुढे म्हणाले, ललित पाटील ससून रुग्णालयातून (Sassoon Hospital) पळून गेला. ससून रुग्णालयाच्या ‘डीन’ने तब्बल नऊ महिने ललित पाटील याला पंचतारांकित सेवा दिली होती. याप्रकरणी आतापर्यंत अनेकांना अटक झाली आहे. परंतु, संजीव ठाकूर यांना अद्याप अटक झालेली नाही. या मागणीसाठी आम्ही सातत्याने रस्त्यावर उतरलो. आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. या प्रकरणात सरकारचं लक्ष गेलं पाहिजे आणि संजीव ठाकूर यांना ज्या ज्या मंत्र्यांनी फोन केले त्यांची देखील चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.

पोलिसांना फोन करणाऱ्यांवर कारवाई करा

ललित पाटील प्रकरणात अनेकांची चौकशी सुरु आहे. आत्तापर्यंत 30 पेक्षा जास्त लोकांना अटक केली आहे.
मात्र, ससून हॉस्पिटलचे डीन संजीव ठाकूर यांना अटक झाली नाही, त्यांना देखील अटक झाली पाहजे.
तसेच ललित पाटील याला ससून हॉस्पिटलमध्ये ठेवण्यासाठी मदत केली त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे.
तुरुंगात असताना डॉक्टरांना ज्यांनी ज्यांनी फोन केले, तसेच पाटील याला अटक केल्यानंतर पोलिसांना (Pune Police) ज्यांनी फोन केले अशांची देखील चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी रविंद्र धंगेकर यांनी केली.

ललित पाटीलने करोडोंचा व्यवहार केला

ललित पाटीलने ससून रुग्णालयात उपचार घेत असताना ड्रग्ज रॅकेट चालवले. याबाबत आम्ही कारवाईची मागणी केली आहे.
पोलीस, डॉक्टरांशी संगनमत ठेवून त्याने अवैद्य धंदा सुरू ठेवला. यात त्याने करोडो रुपयांचा व्यवहार केला.
आम्ही आवाज उठवूनही संजीव ठाकूर यांना अटक केलेली नाही.

हातात स्टेथोस्कोप, अंगावर ॲप्रॉन

रविंद्र धंगेकर हे हातात स्टेथोस्कोप, अंगावर ॲप्रॉन परिधान करुन डॉक्टरांच्या वेशभूषेत विधानभवनात
(Vidhan Bhavan) दाखल झाले. त्यांनी विधानभवन परिसरात उपस्थित असलेल्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
तसेच त्यांच्या अॅप्रॉनवर ‘ललित पाटील याला संरक्षण देणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई झालीच पाहिजे’ असे लिहिले होते.
त्यामुळे ललित पाटील प्रकरणात रविंद्र धंगेकर चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | व्यावसायिकाची 7 लाखांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून आरोपीला अटक

गैरसमजातून 10 किलो वजनाची प्लेट मारली डोक्यात, तरुण गंभीर जखमी; धनकवडी येथील जिममधील घटना

Pune Crime News | मनसे पदाधिकाऱ्याकडे खंडणीची मागणी, दोन माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल; धायरीतील प्रकार

Total
0
Shares
Related Posts
Pune Crime News | Rickshaw driver commits suicide by hanging himself after calling his sister due to wife's immoral relationship with friend; Police register case against wife and friend, incident in Handewadi

Pune Crime News | मित्राबरोबरच्या पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे रिक्षाचालकाने बहिणीला फोन करुन गळफास घेऊन केली आत्महत्या; पत्नी व मित्रावर पोलिसांनी केला गुन्हा दाखल, हांडेवाडी येथील घटना