MLA Rohit Pawar | राज्याचे पुढील मुख्यमंत्री अजित पवार व्हावेत, रोहित पवारांची ‘मन की बात’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके (NCP MLA Nilesh Lanke) यांनी महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होईल, असे विधान केले होते. त्यावर आता आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी माझी इच्छा असल्याचे रोहित पवार (MLA Rohit Pawar) म्हणाले.

 

दिवाळीच्या निमित्ताने राज्य भरातील अनेक कार्यकर्ते पवार कुटुंबियांच्या भेटीला आले होते. यावेळी बारामतीतील गोविंद बागेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), विरोधी पक्षनेता अजित पवार (Ajit Pawar), खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि रोहित पवारांसह (MLA Rohit Pawar) असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले, अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, असे अनेक लोकांचे मत आहे. माझे देखील हेच मत आहे. पण शेवटी आपल्याला आकड्यांचे समीकरण लक्षात घ्यावे लागेल. येत्या काळात मित्रपक्षांना एकत्र आणि विश्वासात घेऊन आमचे पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील. आणि पक्षश्रेष्ठींनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य करावा लागेल.

तसेच एखादी ताकदवान व्यक्ती जेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसेल,
त्याचा प्रशासनावर वचक असेल आणि त्याची काम करण्याची पद्धत सर्वांना माहीत असेल,
तेव्हा प्रशासनाची देखील निर्णय घेण्याची क्षमता वाढते. निर्णय लवकर घेतल्याने लोकांना देखील त्याचा फायदा होणार आहे,
असे देखील रोहित पवार यावेळी म्हणाले.

 

निलेश लंके म्हणाले होते, राज्याचे पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील. जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे.
त्यामुळे पुढील सरकार महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) असणार आहे. राज्याचे पुढचे मुख्यमंत्री देखील राष्ट्रवादी काँग्रेसचेच असणार आहेत.

 

Web Title :- MLA Rohit Pawar | ajit pawar should become maharashtra chief minister rohit pawar statement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bigg Boss Marathi 4 | बिग बॉसच्या घरात अमृता फडणवीस; सदस्यांनी विचारले प्रश्न, म्हणाल्या – ‘हे आहेत महाराष्ट्राचे दोन कॅप्टन’

NCP MLA Nilesh Lanke| राज्याचे पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादीचे असतील, निलेश लंके यांचे सूचक विधान

Kishori Pednekar | उद्धव ठाकरे उशिरा का होईना दौऱ्यावर गेले, किशोरी पेडणेकरांचा शिंदे-फडणवीसांना टोला