हुल्लडबाज कार्यकर्त्यांमुळं आ. संग्राम जगताप गोत्यात ?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – हुल्लड कार्यकर्ते, त्यामुळे पक्ष संघटनेतील कार्यकर्त्यांची वाढती नाराजी, हुल्लडबाजांच्या त्रासामुळे वैतागलेले काही नागरिक ही बाब आमदार संग्राम जगताप यांना विधानसभा निवडणुकीत चांगलीच डोकेदुखी ठरली आहे. कार्यकर्तेही व्यवस्थितरीत्या प्रचार करीत नसल्याने आ. संग्राम जगताप यांची धाकधूक वाढली आहे.

अवघ्या काही दिवसांवर विधानसभेची निवडणुक येऊन ठेपले आहे. असे असताना नगर शहर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांचे कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. हुल्लड कार्यकर्त्यांमुळे संग्राम जगताप यांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. हुल्लड कार्यकर्त्यांमुळेच माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. हुल्लड कार्यकर्त्यांच्या त्रासामुळे राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे यांनी वंचित बहुजन आघाडी तर्फे निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. हुल्लड कार्यकर्ते हे पक्षसंघटनेत जगताप यांची मोठी डोकेदुखी ठरले आहेत. आता याच कार्यकर्त्यांमुळे काही नागरिकांनाही त्रासाला सामोरे जावे लागल्याने त्यांचीही नाराजी वाढली आहे. त्याचा मोठा फटका विधानसभा निवडणुकीत आमदार संग्राम जगताप यांना मिळाला आहे.

या राजकीय परिस्थितीत आमदार संग्राम जगताप यांच्याकडून योग्य कार्यकर्त्यांना बळ दिले जात नसल्याने कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. सरकार कार्यकर्त्यांमुळे जगताप यांची अस्वस्थता वाढली आहे. त्याचा मोठा फटका त्यांना निवडणुकीत बसण्याची चिन्हे आहेत.

Visit : policenama.com

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी