MLA Siddharth Shirole | नद्यांमधील जलपर्णी काढण्यासाठी ग्लायकॉफॉस्फेटचा वापर करण्यास परवानगी द्यावी; आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी

मुंबई – MLA Siddharth Shirole | राज्यातील नद्या जलपर्णी मुक्त करण्यासाठी ग्लायफॉस्फेटच्या योग्य प्रमाणातील वापरास राज्य सरकारने द्यावी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मंगळवारी विधानसभेत केली. (MLA Siddharth Shirole)

ठाणे जिल्ह्यातील उत्तन येथील नदी मधील जलपर्णी ग्लायफॉस्फेट चा वापर करून काढण्याचा प्रयोग चंद्रशेखर भडसावळे यांनी यशस्वी केला.
सध्या ही नदी स्वच्छ व जलपर्णी मुक्त असून हाच पर्याय राज्यातील जलपर्णी असलेल्या नद्यांवर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आहेत. परंतु ग्लायकॉफॉस्फेट वापरण्यास महाराष्ट्र प्रदूषण मंडळ परवानगी देत नाही. तरी नागरिकांच्या आरोग्यास बाधा होणार नाही, एवढ्या प्रमाणात ग्लायकॉफॉस्फेटच्या वापरास राज्य सरकारकडून जर परवानगी देण्यात आली तर राज्यातील बऱ्याच नद्या जलपर्णी मुक्त होतील. याबाबत योग्य निर्देश मंत्री महोदयांनी द्यावेत अशी मागणी विधानसभेत मंगळवारी आमदार शिरोळे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली. (MLA Siddharth Shirole)

या मागणीबाबत मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी लवकरच पुण्यामध्ये बैठक घेण्याचे आश्वासन आमदार शिरोळे यांना दिले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aakash BYJU’S | आकाश बायजूजतर्फे राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा एएनटीएचई-२०२३ची घोषणा; इयत्ता सातवी-बारावीच्या विद्यार्थ्यांना शंभर टक्क्यांपर्यंत शिष्यवृत्ती आणि रोख पुरस्कार

Dengue Cases on the Rise in Pune: Health Authorities on High Alert

Akanksha Puri | आकांशा पुरी मत्सराने गेली मिका सिंहच्या शोमध्ये अन् झाली विजेती

Pune: FIR registered against man and his family members for physically and mentally harassing his wife and cheating her of lakhs of rupees