MLA Sunil Tingre | सिद्धार्थनगर झोपडपट्टीवासीयांना मिळणार हक्काचे घर !

आ. सुनील टिंगरे यांनी विधानसभेत मांडला लक्षवेधी प्रश्न, लवकरच होणार प्रशासकीय बैठक; उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन

 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – MLA Sunil Tingre | सिद्धार्थनगर (विमाननगर) Viman Nagar, Pune येथील झोपडपट्टीवासीयांची घरे रस्ता रुंदीकरणासाठी हटविण्यात आली आहेत. सुमारे २०० झोपड्या आणि १५ दुकाने यामध्ये बाधित झाली आहेत. गेली १४ वर्षे इथली माणसं असुविधांचा सामना करत जंगली भागात रहात आहेत. त्यांना हक्काचे घर कधी मिळणार, असा प्रश्न आमदार सुनील टिंगरे यांनी विधानसभेत उपस्थित केला. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लवकरच याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून बैठक बोलावली जाईल व झोपडपट्टीवासीयांचा प्रश्न सोडविला जाईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे आता लवकरच सिद्धार्थनगर झोपडपट्टीवासीयांचा घराचा प्रश्न सुटणार आहे. (MLA Sunil Tingre)

 

आमदार टिंगरे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले की, पुणे येथे २००९ मध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आंतरराष्ट्रीय खेळाडू, व्हीआयपींच्या वाहनांसाठी विमानतळालगत असलेल्या सिद्धार्थनगर(विमाननगर) झोपडपट्टीतून जाणाऱ्या व्हीआयपी रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले होते. यामध्ये जवळपास २०० झोपड्या आणि १५ दुकाने बाधित झाली होती. तत्कालीन आयुक्त प्रवीणसिंग परदेशी यांनी झोपडपट्टीवासीयांशी चर्चा करून रस्ता रुंदीकरणाचा निर्णय घेतला होता. त्यावेळी परदेशी हे एसआरएचे सीईओदेखील होते. त्यांनी बाधितांना एसआरए योजनेमध्ये घरे आणि दुकाने उपलब्ध करून देण्याचे असे आश्वासन दिले होते. त्यानंतर झोपडपट्टीवासीयांनी विश्वास ठेवून आपली घरे, दुकाने खाली करून रस्त्यासाठी जागा दिली होती. (MLA Sunil Tingre)

तब्बल १४ वर्षे झाली झोपडपट्टीवासीय हक्काच्या घरासाठी लढत आहेत. तरीही अद्याप बाधितांना शासनाच्या कोणत्याही योजनेतून ना महापालिका प्रशासनाने पक्की घरे दिली ना एसआरए योजनेतून मिळाली. दोन्ही बाजूने उडवाउडवीची उत्तरे दिली जात असून जबाबदारी घ्यायला कोणीच तयार नाही. बाधित झोपडपट्टीवासीय असुविधांचा सामना करत जंगली परिसरात राहत असून त्यांना पक्की घरे मिळाली पाहिजेत, अशी जोरदार मागणी आमदार टिंगरे यांनी केली.

 

आमदार टिंगरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, जर कोणी १४ वर्षे घरासाठी लढत असेल तर त्यांना हक्काची घरे मिळाली पाहिजेत.
याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुणे महापालिका आयुक्त, एसआरएचे सीईओ यांची बैठक बोलावून हा प्रश्न सोडविला जाईल.
तसेच ज्याठिकाणी एसआरए योजना लागू करता येईल, त्याठिकाणी ती लागू करून झोपडपट्टी निर्मूलनासाठीदेखील प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

 

Web Title :- MLA Sunil Tingre | Siddharth Nagar slum dwellers will get their rightful house! MLA Sunil Tingre

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या प्रश्नांनी शिक्षणमंत्री केसरकर घायाळ; असं काय घडलं नेमकं?

Devendra Fadnavis | उपमुख्यमंत्री खोटे बोलले, वीज तोडल्या प्रकरणी शेतकऱ्याची थेट फडणवीसांविरुद्ध पोलिसांत तक्रार

Pune Pimpri ACB Trap | 3 लाखाच्या लाच प्रकरणी पिंपरीतील पोलिस उपनिरीक्षकावर अ‍ॅन्टी करप्शनकडून गुन्हा