Pune Pimpri ACB Trap | 3 लाखाच्या लाच प्रकरणी पिंपरीतील पोलिस उपनिरीक्षकावर अ‍ॅन्टी करप्शनकडून गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri ACB Trap | पिंपरी पोलिस स्टेशनमध्ये (Pimpri Police Station) दाखल असलेल्या तक्रारी अर्जावरून आरोपी न करण्यासाठी तसेच सदरील अर्ज दिवाणी बाब म्हणून फाईल करण्यासाठी 3 लाख रूपयाच्या लाचेची मागणी करत 2 लाखांवर ‘सेटल’ होऊन लाचेची मागणी केल्याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकावर पुणे अ‍ॅन्टी करप्शन विभागाने गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri ACB Trap)

पोलिस उपनिरीक्षक रोहित गणेश डोळस Rohit Ganesh Dolas (31) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पीएसआयचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपरी पोलिस ठाण्यात एक तक्रारी अर्ज दाखल आहे. त्या अर्जावरून अ‍ॅन्टी करप्शनकडे तक्रार देणार्‍याच्या मावस भावास आरोपी न करण्यासाठी तसेच पिंपरी पोलिस ठाण्यात प्राप्त झालेला अर्ज हा दिवाणी बाब म्हणून फाईल करण्यासाठी सुरूवातीला पोलिस उपनिरीक्षक डोळस यांनी 3 लाख रूपयाच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 2 लाख रूपयांची मागणी केली. (Pune Pimpri ACB Trap)

तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पोलिस उपनिरीक्षक रोहित डोळस यांच्याविरूध्द तक्रार दिली. प्राप्त झालेल्या तक्रारीची दि. 2 डिसेंबर 2022 रोजी पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये पीएसआय रोहित गणेश डोळस हे लाचेची मागणी करीत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आज (दि. 30 डिसेंबर) अ‍ॅन्टी करप्शनकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Bribe Case)

पोलिस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe), अप्पर अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भारत साळुंखे (PI Bharat Salunkhe), संदीप वर्‍हाडे
PI Sandeep Vrhade) , पोलिस हवालदार मुकुंद अयाचीत, पोलिस कर्मचारी भूषण ठाकूर आणि चालक
एएसआय जाधव यांनी पडताळणी करून गुन्हा दाखल केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास एसीबी पुणेचे अधिकारी करीत आहेत.

Web Title :– Pune Pimpri ACB Trap | An anti-corruption case has been filed against a police sub-inspector rohit ganesh dolas in Pimpri in connection with a bribe of Rs 3 lakh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gold-Silver Rate Today | सोनं खेरेदीने नवीन वर्षाचे स्वागत करण्याची सुवर्णसंधी, सोने-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचा दर

Ajit Pawar | ‘लाड चाललेत नुसते सगळे…’ असे म्हणत अजित पवार भाजपच्या ‘या’ मंत्र्यावर संतापले, सुनावले खडे बोल

Madhura Deshpande | तब्बल 3 वर्षांनी अभिनेत्री मधुरा देशपांडे दिसणार ‘या’ मालिकेत; साकारणार ‘हि’ महत्त्वाची भूमिका