मराठीसाठी मनसे आक्रमक ! पुण्यानंतर फोडली मुंबईमधील Amazon ची कार्यालये

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे आता मराठीच्या मुद्द्यावरून आक्रमक झाली आहे. मनसेनं आता पुण्यानंतर ॲमेझोन (Amazon)ची मुंबईतील कार्यलाये फोडली आहेत. चांदिवली येथील मॅनेझॉनच्या 2 कार्यालयात घुसून मनसे कार्यकर्त्यांनी तोतफोड केली आहे. मनसेनं याआधीही ॲमेझोनचं पुण्यातील कोंढवा भागातील कार्यालय फोडलं आहे. मराठी नाय तर ॲमेझॉन नाय अशी घोषणाबाजीही यावेळी कार्यकर्त्यांनी केली.

राज ठाकरेंना नोटीस
मराठी भाषेसाठी मनसेनं सुरू केल्या मोहिमेविरोधात ॲमेझॉननं कोर्टात धाव घेतली आहे. यानंतर दिंडोशी कोर्टानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना नोटीस बजावली आहे. राज ठाकरे आणि मनसेच्या 5 सचिवांना कोर्टानं 5 जानेवारी रोजी कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिला आहे. या नोटीसीनंतर मनसे नेते अखिल चित्रे यांनी प्रतिक्रिया दिली.

काय होती मनसेची प्रतिक्रिया ?
न्यायालयानं नोटीस पाठवल्यानंतर मनसेनं यावर प्रतिक्रिया देत आपण यावर ठाम राहणार असल्याचं सांगितलं आहे. इतकंच नाही तर याची मोठी किंमत मोजावी लागेल असा इशाराही ॲमेझॉनला दिला होता. राज ठाकरेंना नोटीस पाठवणाऱ्या ॲमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजणार अशी प्रतिक्रिया अखिल चित्रे यांनी दिली होती.