‘मनसे’च्या बांगलादेशी मोहिमेचा ‘फज्जा’, ताब्यात घेतलेले तिघे निघाले ‘भारतीय’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून मनसे कडून चालू असलेली बांग्लादेशी हटाव मोहीम फसलेली पाहायला मिळत आहे. शनिवारी बालाजीनगर मध्ये मनसेचे ५० कार्यकर्ते नागरिकांचे ओळखपत्र तपासात होते , तेव्हा बांग्लादेशी असल्याचा संशयावरून ३ जणांना ताब्यात घेतले होते. परंतु ते तिघे जण मूलतः भारतीय असल्याचे समजताच पुणे पोलिसांनी त्यांना सोडून दिले आहे.

image.png
पुण्यातील धनकवडी भागात मनसेच्या कार्यकर्त्यांनी बांग्लादेशी घुसखोरांचा शोध सुरु केला असून, तीन जणांना बांग्लादेशी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेतले, पण ते भारतीयच निघाले. अटक केलेली तिन्ही कुटुंब ही धनकवडीं येथील बालाजीनगर येथे राहतात, त्यांनी तपासणीच्या वेळी आपली सर्व कागदपत्रे मनसे कार्यकर्त्यांना दाखवली होती आणि आपण बांग्लादेशी नसून पश्चिम बंगालचे रहिवासी आहोत असे ते सांगत होते, परंतु पोलिसांनी अधिक चौकशी केली असता ते भारतीयच असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मनसेची ही मोहीम फसल्याची चर्चा सुरु झाली आहे.

काही दिवसांपूर्वी मनसेने ठाणे, बोरिवली या भागात बांग्लादेशी हटाव मोहीम सुरु केली होती. या वेळी ठाण्यात ३ कुटुंब बांग्लादेशी असल्याचे समोर आले होते, त्यांच्याजवळ आधार कार्ड , पॅनकार्ड आदी ओळखपत्रे होती त्यासोबतच महत्वाचे म्हणजे त्यांच्याकडे बांग्लादेशी पासपोर्ट सुद्धा अढळ होता असे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितले.

बांग्लादेशी की बिहारी ?
बालाजी नगरमध्ये सापडलेले संशयित हे भारतीयच होते, परंतु आधी कागदपत्रांची विचारणा मनसे कार्यकर्त्यांनी कलेची असता, त्यांनी आपण बांगलादेशी नाही तर बिहारी असल्याचे सांगितले त्यामुळे गोंधळ निर्माण झाला, म्हणून पुढील चौकशी पोलिसांनी केली. मनसे ने एकूण आठ कुटुंबाच्या ओळखपत्राची तपासणी केली, लोकांना संशय आल्याने ५ घरे ही बंद अवस्थेत आढळून आली. ही कुटुंब बालाजीनगरमधील गुलमोहोर अपार्टमेंटमध्ये राहत होती.

संयुक्तपणे केली होती कारवाई
अर्नाळा, कळंब, राजोडी परिसरात सुद्धा बांग्लादेशी घुसखोरांवर कारवाई केली गेली होती. यावेळी १२ पुरुष, १ अल्पवयीन मुलगा आणि १० महिलांचा समावेश होता. हे सर्व बांग्लादेशी रहिवासी असून या ठिकाणी ते बेकायदेशीरपणे राहत होते. ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक, पालघर दशतवाद विरोधी पथक आणिअर्नाळ पोलिसांनी एकत्रितपणे केली .
image.png