MNS Chief Raj Thackeray | जालन्यामध्ये आंदोलनस्थळी राज ठाकरेंनी घेतली भेट; म्हणाले – ”गेंड्याची कातडी असलेल्या या लोकांसाठी जीव गमवू नका…”

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – MNS Chief Raj Thackeray | जालनामध्ये झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांवर करण्यात आलेल्या (Maratha Reservation Movement) लाठीचार्जचे पडसाद राज्यभर उमटत आहे. अनेक राजकारण्यांनी जालना येथील आंदोनकर्त्यांची भेट घेऊन सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली होती. आता अंतरवली सराटी (Antarwali Sarathi) येथे मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी भेट घेतली असून आंदोलनकर्त्यांना आधार दिला आहे. तुम्ही पोलिसांना दोष देवू नका. त्यांना आदेश कोणी दिले त्यांना दोष द्या. ज्यांनी लाठीमार केला त्यांना मराठवाडा येण्यास बंदी करा. माफी मागत नाहीत तोपर्यंत इकडे फिरकू देवू नका. असे राज ठाकरे यांनी जालना (Jalna) येथील आंदोलनकर्त्यांना सांगितले आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना मनसे स्टाईल उत्तर देत बजावले आहे. यावेळी त्यांच्यासह अमित ठाकरे (Amit Thackeray) देखील उपस्थित होते. तुम्ही पोलिसांना दोष देवू नका. त्यांना आदेश कोणी दिले त्यांना दोष द्या. गेंड्याची कातडी असलेल्या या लोकांसाठी जीव गमवू नका, असे कळकळीचे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. जालन्यातील आंदोलन कर्त्यांशी संवाद साधून मराठा आरक्षणासाठी आपण मुख्यमंत्र्यांसह तज्ज्ञांशी बोलू. प्रश्न सुटण्यासारखा असेल तर नक्की त्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही देखील राज यांनी दिली आहे.

जालन्यामध्ये मराठा आरक्षणासाठी चालू असलेल्या अंतरवाली सराटी येथील आंदोलनस्थळी आज (दि.04) सकाळी राज ठाकरे यांनी आंदोलनकर्त्यांना दिलासा दिला. यावेळी त्यांनी उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्याशी संवाद साधून आंदोलनाची अधिक माहिती घेतली. त्यानंतर उपस्थित नागरिकांसामोर ठाकरे म्हणाले की, “ज्या ज्या वेळी मी काही गोष्टी सांगितल्या त्या त्या वेळी त्या तुमच्यापर्यंत चुकीच्या पोहोचविण्यात आल्या. मोर्चे निघत होते तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही असे मी तेव्हाच सांगितलं होते. ते सगळे राजकारणी तुमचा वापर करून घेतील, मते घेतील, दुर्लक्ष करतील असे मी तुम्हा सर्वांना या आधीच सांगितले होते.

सुप्रिम कोर्टाने (Supreme Court) आरक्षणाबाबत निकाल दिला आहे. विरोधात असले की मोर्चे काढायचे आणि सत्तेत गेले की गोळीबार करायचा, लाठ्या मारायच्या. तुम्ही पोलिसांना दोष देवू नका. पोलिसांना कोणी आदेश कोणी दिले त्यांना दोष द्या. पोलिस काय करणार ते तुमच्या आमच्यातले आहेत. जे वरून सांगितले ती गोष्ट करावी लागणार. त्यामुळे तुमच्यावर ज्या लोकांनी लाठ्या बरसावल्या, गोळीबार केला, त्यांना मराठवाडा बंदी करा आणि जोपर्यंत ते माफी मागत नाहीत तोपर्यंत इकडे पाऊल टाकू देवू नका.” अशा क़डक शब्दांमध्ये आवाहन राज ठाकरे यांनी केले.

राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यावर देखील राज ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
(CM Eknath Shinde) यांच्याशी मराठा आरक्षणाबाबत चर्चा करणार असल्याचे देखील यांनी सांगितले आहे.
“मराठा आरक्षणाचा मुद्दा हा फक्त निवडणुकांपुरता व राजकारणासाठी वापरला जातो यावर त्यांनी प्रकाश टाकला.
माता भगिणींवर झालेला लाठीचार्ज पाहून मी येथे आलो आहे. मला राजकारण करायचे नाही.
तज्ज्ञांशी देखील संवाद साधू आणि प्रश्न सुटण्यासारखा असेल तर नक्की सोडवला जाईल असे.” राज ठाकरे म्हणाले आहेत.

मराठा आरक्षणाचा मुद्दा हा महत्त्वाचा असला तरी देखील तुम्ही गेंड्यांच्या कातडीच्या लोकांसाठी आपला जीव गमावू नका.
एकजण मेला तर फरक पडत नाही. पण आपला जीव आपल्यासाठी महत्त्वाचा आहे.
निवडणूक येतील तेव्हा अशा काही गोष्टी सांगतिल्या जातील पण तेव्हा काठीचे पाठीवरील वळ लक्षात ठेवा.
मी या मुद्द्यावर राजकारण करत नाही आणि उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis)
राजकारण करू नये म्हणतात. तुम्ही विरोधी पक्षात असते तर काय केले असते असा सवाल राज ठाकरे (Raj Thackeray)
यांनी उपस्थित केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Cyber Crime News | नागपूर पोलीस आयुक्त आणि भंडारा पोलीस अधीक्षकांचे ‘फेक प्रोफाईल’, सायबर गुन्हेगारांपासून सावध राहण्याचे आवाहन

Real Estate Bank Loan | रिअल इस्टेट कर्जाच्या प्रमाणात विक्रमी वाढ; जुलैमध्ये 28 लाख करोड रुपयांवर पोहोचला आकडा